30 April 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

लॉकडाउनमध्ये वाईन शॉपला परवानगी नाहीच, केंद्रीय गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, २५ एप्रिल: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाउनच्या कालावधीत ग्रामीण भागात थोड्याप्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने खुली होण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान लॉकडाउनच्या कालावधीत मद्य विक्रीची दुकाने खुली करावी, अशी मागणी होत होती. केंद्र सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लॉकडाउनच्या काळात मद्य विक्रीच्या दुकानांना कोणतीही मुभा मिळणार नाही, असे गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, लॉकडाउनच्या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील एकल व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हॉटस्पॉटची ठिकाणांशिवाय शहरी भागातील दुकाने उघडण्यासही मुभा देण्यात आली आहे. मात्र मद्य विक्रीची दुकानेही बंदच ठेवण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे.

तत्पूर्वी, मुंबईत लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. जिल्हाधाकिरी राजीव निवतकर यांनी यासंबंधी स्पष्ट माहिती दिली होती. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते. मात्र जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत लागू असणार असल्याचं सांगितलं होतं.

तसेच दोन दिवसांपूर्वी ‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे आणि कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र त्यानंतर आजच्या सामनातून राज ठाकरे यांना लक्ष करण्यात आलं आहे.

 

News English Summary: There has been little relaxation in rural areas during the nationwide lockdown period against the backdrop of the corona virus. This has paved the way for many small and big shops to open. Meanwhile, there was a demand that liquor shops should be opened during the lockdown period. The central government has clarified its position on this. Liquor stores will not be allowed during the lockdown, the home ministry said on Saturday.

News English Title: Sale of liquor remains prohibited in Lockdown Union Government clarifies on order allowing reopening of shops amid coronavirus outbreak.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x