27 July 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका
x

BJP Planning Like 2014 | इव्हेन्ट मालिकेतून मोदी ब्रँड लोकांच्या मेंदूत पुन्हा लादण्याची योजना, 9 वर्षात महागाईने जनतेचा खर्च किती पट वाढला पहा

Highlights:

  • लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला आणि पूर्ण फसले आहेत
  • महागाईचं सत्य काय?
  • सर्वेक्षण सोडा, वास्तवाकडे या आणि आकडेवारी पहा
  • आता डाळीच्या किमतींकडे या.. बघा जनता किती पैसा मोजतेय
  • खाद्य तेल दर तर भीषण वाढले
  • टोमॅटो वगळता सर्व काही महाग झाले आहे
BJP Next Planning

BJP Planning Like 2014 | मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण होत आहेत. 26 मे रोजी नरेंद्र मोदी केंद्रातील सत्तेला 9 वर्षे पूर्ण करणार आहेत. नऊ वर्षपूर्वी मोदी यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर काँग्रेसला मत देऊ नका असं आवाहन करताना, भाजप सत्तेत आल्यास महागाई संपुष्टात आणेल आणि प्रति वर्ष २ कोटी लोकांना रोजगार (खाजगी क्षेत्र) देईल असं वचन जनतेला दिलं होतं.

लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला आणि पूर्ण फसले आहेत
लोकांनी देखील मोदींवर विश्वास ठेवला आणि पूर्ण फसले आहेत असंच आकडेवारी सांगते आहे. मागील या नऊ वर्षांत अदानी आणि भाजप नेत्यांचाच विकास झाला असून भाजप हा भारतातील सर्वात धनवान राजकीय पक्ष बनला आहे. सामान्य लोंकांशी निगडित महागाई आणि बेरोजगारी अत्यंत वाईट स्थितीत आहे असं चित्र आहे. सामान्य लोकांना दैनंदिन जीवनातील खर्च भागवताना देखील अडचणी येतं आहेत. मात्र मागील ९ वर्षात मोदींनी महागाई आणि बेरोजगारी यावर चाकर शब्द देखील काढला नाही. उलट राष्ट्रवाद आणि धार्मिक मुद्द्यांवर बोलून जनतेला महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून कसं विचलित करता येईल अशाप्रकारे राजकीय खेळी सुरु आहेत. नवीन संसदेच्या इमारतीचे उदघाटन, नंतर अयोध्या राम मंदिर उदघाटन आणि मुंबई ते देशात सर्वत्र मोदींच्या इव्हेंटची मालिका सुरु होणार असून २४ तास तेच लोंकांवर २०१४ प्रमाणे लादण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे पुन्हा २०१४ प्रमाणे मोदींच्या नावाने प्रचंड मार्केटिंग, ब्रॅण्डिंग आणि इव्हेन्ट मालिका करण्याची योजना भाजपने आखल्याचे वृत्त आहे. त्यासाठी केंद्र आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील जनतेचा पैसा प्रचंड प्रमाणात खर्च केला जाणार अशी माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचे इव्हेन्ट वर इव्हेन्ट आयोजित करून सर्व वृत्तवाहिन्या व्यापून टाकायच्या आणि लोकांच्या डोक्यात आणि विचारात मोदी ब्रँड लादायचे अशी ही योजना आहे. यामध्ये महागाई आणि बेरोजगारी या मुद्दयांनां शून्य किंमत असेल असे संकेत मिळत आहेत.

महागाईचं सत्य काय?
मोदींच्या पुढील राजकीय मार्गात सर्वात मोठा अडथळा आहेत महागाई आणि बेरोजगारी हे भीषण अवस्थेतील मुद्दे. एका सर्वेक्षणात ५७ टक्के लोकांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकार अत्यंत वाईट प्रकारे काम करत असल्याचे म्हटले आहे. लोकनीती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) यांच्या सहकार्याने एनडीटीव्हीने केलेल्या विशेष सर्वेक्षणातून हे दिसून आले आहे. १० ते १९ मे दरम्यान १९ राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षण सोडा, वास्तवाकडे या आणि आकडेवारी पहा
मोदी सरकार २.० च्या कार्यकाळात पीठ-तेल-डाळींपासून मीठ-साखर-चहाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या आहेत, हे सरकारच्या आकडेवारीच्या माध्यमातून पाहूया. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 24 मे 2019 रोजी तांदळाचा सरासरी किरकोळ दर 31.07 रुपये होता. गेल्या 4 वर्षांत तो 26 टक्क्यांनी महाग होऊन 39.19 रुपयांवर पोहोचला आहे. गव्हाचा विचार केला तर गेल्या ४ वर्षांत तो २२ टक्क्यांनी वाढून २३.६३ रुपयांवरून २८.८६ रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे गव्हाचे पीठ ३१.४९ टक्क्यांनी वाढून २५.९८ रुपयांवरून ३४.१६ रुपयांवर पोहोचले आहे.

आता डाळीच्या किमतींकडे या.. बघा जनता किती पैसा मोजतेय
मोदी सरकार २.० मध्ये डाळींचे भाव १२ वरून ५१ टक्क्यांवर गेले. उडीद डाळीच्या दरात ५१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. चणाडाळ केवळ १२ टक्क्यांनी महागली. या चार वर्षांत तूरडाळ ४८ टक्क्यांहून अधिक महाग झाली आहे. मूग डाळीत सरासरी ३५ टक्के तर मसूर डाळीत ४९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

खाद्य तेल दर तर भीषण वाढले
मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वात मोठी वाढ वनस्पती तेलाच्या (पॅक) दरात दिसून आली. त्यात या कालावधीत सुमारे ६४ टक्के वाढ दिसून आली. मोहरीचे तेल (पॅक) सुमारे ४१ टक्क्यांनी महागले, तर भुईमुगाचे तेल ५६ टक्क्यांनी महागले. सोया तेलाच्या दरात ४९ टक्के, सूर्यफूलच्या दरात सुमारे ५० टक्के, पाम तेलाच्या दरात ४८ टक्के वाढ झाली आहे.

टोमॅटो वगळता सर्व काही महाग झाले आहे
एक टोमॅटो वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या दैनंदिन किरकोळ दरात या चार वर्षांत वाढ झाली आहे. या काळात टोमॅटो २८ टक्क्यांहून अधिक स्वस्त झाला आहे. कांदा ३० टक्के तर बटाटे २२ टक्क्यांनी महागले आहेत. मिठाचे दरही ४३ टक्क्यांनी वाढले आहेत. चहा ३० टक्के तर गूळ १३ टक्क्यांनी महागला आहे. साखर केवळ १० टक्के तर दूध ३१ टक्क्यांनी महागले आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार :

Infaltion-Modi-Govt

 

News Title: BJP Next Planning before loksabha Election check details on 26 May 2023.

हॅशटॅग्स

#BJP Next Planning(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x