28 April 2024 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार? नितीश कुमार यांची JDU खासदार-आमदारांसोबत वन-टू-वन भेट, काय आहे रणनीती?

Bihar Lok Sabha Election 2024

Bihar Lok Sabha Politics | लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांनी पक्षमजबूत करण्यास सुरुवात केली आहे. जेडीयू’चे माजी खासदार आणि माजी आमदार सीएम हाउसवर पोहोचले आहेत. नितीश प्रत्येक नेत्याला स्वतंत्रपणे भेटत आहेत. आम्ही त्यांच्याकडून राजकीय आणि मैदानी अभिप्राय घेत आहोत.

याआधीही नितीश यांनी जेडीयूचे खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्यांची भेट घेतली होती असं माध्यमांना सांगितलं. केवळ विद्यमान नव्हे तर माजी आमदार-खासदारांना सुद्धा नितीश कुमार भेटत असून ते राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी रणनीती आखात असून, भाजपचा राज्यातून सुपडा साफ करण्याचा रणनीतीवर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

JDU नेत्यांसोबत वन-टू-वन भेटी आणि चर्चा

नितीश यांच्या जेडीयूच्या माजी खासदार आणि आमदारांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. माजी आमदार आणि खासदारांची बैठक दोन शिफ्टमध्ये होणार आहे. यावेळी बिहार सरकारमधील अर्थमंत्री विजय चौधरी सुद्धा उपस्थित होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर जेडीयू नेत्यांकडून माहिती घेत आहे. याआधी 3 जून रोजी नितीश यांनी पक्षाच्या आमदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती, त्यावेळी आमदारांना अनेक सूचना दिल्या. त्याचबरोबर परिसरातील राजकीय अभिप्रायही घेण्यात आला. २ जुलै रोजी नितीश यांनी पक्षाच्या खासदारांची भेट घेतली होती.

बिहारच्या महाआघाडी सरकारमध्ये बैठक वाढल्या

सध्या विरोधकांच्या महाआघाडी सरकारमध्ये प्रचंड हालचाली सुरु आहेत. मंत्रिमंडळातील वाद देखील मिटवले जातं आहेत, एवढेच नव्हे तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी काँग्रेसला सुद्धा जागा देण्यात येणार आहेत. काँग्रेसला बिहारमध्ये आणखी दोन मंत्रिपदे हवी आहेत. दरम्यान, विरोधकांच्या बैठकीत नितीश कुमार यांना विशेष स्थान असल्याने JDU नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तसेच बिहार राज्य मोदींना पायउतार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

News Title : Bihar Lok Sabha Election 2024 check details on 30 July 2023.

हॅशटॅग्स

#Bihar Lok Sabha Election 2024(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x