5 June 2023 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या Cash Transactions | तुम्हीही खूप कॅश ट्रान्झॅक्शन्स करत असाल तर नियम जाणून घ्या आणि इन्कम टॅक्स नोटीस टाळा ATM Cash Withdrawal Limit | तुम्ही बँक ATM वापरता? प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा बदलली, नवा नियम आणि रक्कम लक्षात ठेवा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 05 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Hindalco Industries Share Price | आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी, हिंडाल्को इंडस्ट्रीज शेअरवर डिव्हीडंड जाहीर, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट पहा

Highlights:

  • Hindalco Industries Share Price
  • आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी
  • हिंडाल्को इंडस्ट्रीज शेअरची 52 आठवड्यांची पातळी
  • 33,959 कोटी रुपये कर्ज
  • गुंतवणूकदारांना 3 रुपये लाभांश वाटप
Hindalco Industries Share Price

Hindalco Industries Share Price | ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2023 तिमाहीत ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने 37 टक्के घसरणीसह 2,411 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या मार्च तिमाहीत ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने 3,860 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी
आदित्य बिर्ला ग्रुपचा भाग असलेल्या ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने मार्च तिमाहीत 56,209 कोटी रुपये महसूल संकलित केले आहे. तर कंपनीचा एकूण खर्च 53,372 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 56,057 कोटी रुपये होता. तर खर्च 51,026 कोटी रुपये होता. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 400.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंडाल्को इंडस्ट्रीज शेअरची 52 आठवड्यांची पातळी
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर 407.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. YTD आधारावर ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 16.42 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. 18 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 504 रुपये ही आपल्या 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

33,959 कोटी रुपये कर्ज
‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी माहिती दिली की, 31 मार्च 2023 रोजी ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीवर 33,959 कोटी रुपये निव्वळ कर्ज आहे. तर 31 डिसेंबर 2022 रोजी कंपनीवरील कर्ज 41,716 कोटी रुपये होते.

गुंतवणूकदारांना 3 रुपये लाभांश वाटप
‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीच्या संचालक मंडळाने मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी गुंतवणूकदारांना 3 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ ही कंपनी कमाईच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी अॅल्युमिनियम कंपनी मानली जाते. ही कंपनी भारतातील निम्म्यापेक्षा जास्त तांब्याची गरज पूर्ण करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hindalco Industries Share Price today on 25 May 2023.

हॅशटॅग्स

#Hindalco Industries Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x