हवं तर बसवर भाजपाचा झेंडा लावा, पण मजुरांसाठी 'त्या' बसेस सोडा' - प्रियांका गांधी

लखनौ, २० मे: उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी सरकारमध्ये ‘लेटरवॉर’ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी परस्परांवर कुरघोडी करणारी पत्रे पाठवली जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेऊन योगी सरकारवर हल्ला चढवला. ही वेळ राजकारणाची नसून आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशातील मजूर आपापल्या मूळगावी परतत आहेत. हे लोक फक्त भारतीयच नाहीत तर ते देशाचा कणा आहेत. ते रक्त आणि घाम गाळतात म्हणून देश चालतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
उप्र सरकार ने हद कर दी है। जब राजनीतिक परहेजों को परे करते हुए त्रस्त और असहाय प्रवासी भाई बहनों को मदद करने का मौका मिला तो दुनिया भर की बाधाएँ सामने रख दिए। @myogiadityanath जी इन बसों पर आप चाहें तो भाजपा का बैनर लगा दीजिए, अपने पोस्टर बेशक लगा दीजिए लेकिन हमारे सेवा भाव..1/2 pic.twitter.com/4SW3cax2H5
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 19, 2020
उत्तर प्रदेश सरकारने आपल्या भूमिकेत बदल करत, सर्व बस लखनऊमध्ये अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. ज्यावरुन काँग्रेस आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली. मात्र या सर्व गदारोळात राज्याबाहेर अडकलेल्या मजुरांचा प्रश्न तसाच कायम राहिल्यामुळे अखेरीस प्रियंका गांधी यांनी, व्हिडीओ संदेशाद्वारे उत्तर प्रदेश सरकारला खास विनंती केली आहे. “सर्व बस सरकारच्या ताब्यात दिल्यानंतर आता २४ तास उलटले आहेत. तुम्हाला त्या बसवर भाजपाचा झेंडा लावायचा असेल तर लावा, या बसची सोय तुम्ही केलीत असं सांगायचं असेल तर तसंही सांगा…पण कृपया या बसचा वापर करण्याची परवानगी द्या. बाहेर अडकलेल्या कामगारांना घरी आणण्याची परवानगी द्या.”
श्रमिक भाई – बहनों के लिए ये संकट का समय है। इस समय संवेदना साथ उनकी मदद करना ही हम सबका उद्देश्य है। https://t.co/omrja4xjme
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 20, 2020
आपण सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखणं गरजेचं आहे. बाहेर अडकलेले हे मजूर फक्त भारतीय नाहीत, तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. या मजुरांच्या परिश्रमावर हा देश चालतो. त्यांना घरी आणणं ही सर्वांची जबाबदारी आहे, ही वेळ राजकारण करायची नाही, अशा शब्दांमध्ये प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला शालजोडीतले लगावले आहेत.
News English Summary: Priyanka Gandhi on Wednesday held a press conference and attacked the Yogi government. This is not the time for politics, we must recognize our responsibility. Workers from Uttar Pradesh from different parts of the country are returning to their hometowns. These people are not just Indians, they are the backbone of the country.
News English Title: Paste BJP party Flags On Buses But Let Us Get The Migrants Home Says Priyanka Gandhi Vadra News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?
-
Voltamp Transformers Share Price | जबरदस्त! 225 टक्के परतावा देणारा हा शेअर तेजीत वाढतोय, ही आहे टार्गेट प्राईस
-
Safe Money Investment | हे आहेत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय, तुमचा पैसा बुडण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा
-
Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा