26 July 2021 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

CAA कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Prakash Ambedkar, Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

या बैठकीनंतर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्या मनात आदर कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या वादात आम्हाला पडायचं नाही. राजकीय पक्षांच्या भांडणात पडून आम्हाला पॉलिटीकल स्कोर वाढवायचा नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा ही पदवी लोकांनी दिलेली आहे, लोकांनी हे मानलेलं आहे. रयतेचा राजा म्हणून लोकांनी त्यांना मानलेलं आहे, तेच आम्हाला महत्त्वाचं आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.

 

Web Title:  Prakash Ambedkar has called Maharashtra band on 24 January against CAA.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(117)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x