15 June 2021 9:38 PM
अँप डाउनलोड

किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या म्हणत तेच शिवसेनेत प्रवेश करतील

NCP MLA Rohit Pawar, BJP Maharashtra President Chandrakant Patil, MahaVikas Aghadi

मुंबई, २९ जुलै : काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शिवसेनेला पुन्हा मैत्रीची हाक देत, “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही”, असे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळीचे वातावरण निर्माण झाले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

“राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली. शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता असल्याचे ते म्हणाले होते.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख न करता टीका केली आहे. “आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

 

News English Summary: NCP MLA Rohit Pawar has tweeted in which he has criticized Chandrakant Patil without naming him. A senior BJP leader said that he is ready to go with Shiv Sena even today.

News English Title: NCP MLA Rohit Pawar Raction On BJP Maharashtra President Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(89)#RohitPawar(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x