28 March 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

मुंबईकरांमध्ये स्वतःहून हर्ड इम्युनिटी तयार झाली..श्रेय घेतोय बेबी पेंग्विन आणि बीएमसी

Aaditya Thackeray, Herd Immunity, BMC, Baby Penguine, MLA Nitesh Rane

मुंबई, २९ जुलै : मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आहे. पुढील काही दिवसांमध्ये ती आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर अशीच संख्या कमी होत राहिली तर नक्कीच करोनावर आपण नियंत्रण मिळवल्याचं म्हणता येईल. मुंबईची सद्यस्थिती पाहता हर्ड इम्युनिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.

निती आयोग, मुंबई महानगरपालिका, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांच्यावतीने आर उत्तर (दहिसर), एम पश्चिम (चेंबूर)आणि एफ उत्तर (माटुंगा) या भागांत जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये रॅन्डमली पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आलं. दरम्यान, या तीन विभागांतील ६ हजार ९३६ जणांचे रक्ताचे नमुने घेण्यातआले. तसंच झोपडपट्टीतील निर्धारित लक्ष्यापैकी अधिक तर बिगरझोपडपट्टी भागांतील ७० टक्के रहिवाशी सहभागी झाले होते. त्यातील झोपडपट्टीतील ५७ टक्के तर बिगरझोपडपट्टी भागांतील १६ टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याची माहिती समोर आली.

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, ही मुंबईकरांसाठी अतिशय चांगली बातमी आहे. मुंबईच्या झोपडपट्टी भागामधील ५७ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्यामुळं त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता फार कमी असल्याचं ते म्हणाले. परिणामी या नागरिकांना कोरोनापासून मुक्ती मिळाली असली तरीही त्यांनी अधिक काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणं, मास्क लावणं, स्वच्छता राखणं या प्राथमिक गोष्टींवर काकाणी यांनी भर दिला.

सुरुवातीपासूनच्या संशोधनाचा संदर्भ देत आयुक्तांनी महिलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण कमी असल्याची बाब अधोरेखित केली. महिलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेनं चांगली असल्याचं म्हणत त्यांनी हा मुद्दा मांडला. सेरो सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला मुंबईकरांची सामूदायिक रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचं निदर्शनास येत आहे. यालाच हर्ड इम्युनिटी असंही म्हटलं जातं.

यावर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला आणि आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “आरएसएस आणि इतर सामाजिक संस्थांनी दिवस रात्र मेहनत केल्याने धारावी कोरोना मुक्त झाली….मुंबईकरांची सामूदायिक रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या प्रयत्नानेच वाढली आहे….पण श्रेय घेत आहेत बीएमसी आणि बेबी पेंग्विन……ये पब्लिक है ये सब जाणती हैं!!

 

News English Summary: Given the current situation in Mumbai, there is a possibility of herd immunity. A recent survey found that 57 percent of people develop antibodies.

News English Title: Mumbai Coronavirus Patients Numbers Decreasing Herd Immunity Developing In Body Found In Research News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x