1 February 2023 3:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Union Budget 2023 Income Tax | इन्कम टॅक्स सूटचा कोणाला किती लाभ मिळणार? तज्ज्ञांकडून समजून घ्या Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा TCS Share Price | अर्थसंकल्पाच्या दिवशी तज्ज्ञांचा टीसीएस शेअर खरेदीचा सल्ला, मोठा परतावा देईल, कारण पहा
x

यूपी बलात्कार प्रकरण, भाजप महिला प्रवक्त्याच झाल्या आक्रमक

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेशातील महिला प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेन्द्र मोदी यांनाच ट्विट करत भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगार यांचं १८ वर्षीय मुलीवरील बलात्कर व हत्येच प्रकरण पक्षाला २०१९ मध्ये भोवणार असं स्पष्टं केलं आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नावमधील भाजप आमदाराच्या १८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात मलीन होत असून ती सुधारण्यासाठी प्रयत्नं न केल्यास २०१९ मध्ये भाजपाला मोठी किंमत चुकवावी लागेल याची आठवण या महिला प्रवक्त्यांनी खुद्द अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनाच ट्विट करून अवगत केलं आहे.

भाजपच्या उत्तर प्रदेशातील महिला प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी धक्कादायक ट्विट करत, ‘उत्तर प्रदेशला वाचवा’ असं विधान केलं आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारचे निर्णय खूप लाजिरवाणे असून त्यामुळे भाजप सरकार धोक्यात येईल आणि आपण बघितलेली सर्व स्वप्नं २०१९ मध्ये धुळीला मिळतील असा धोक्याचा इशाराच भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान अमित शहा यांना ट्विट करून दिला आहे.

भाजपच्या उत्तर प्रदेशातील महिला प्रवक्त्या दिप्ती भारद्वाज यांनी स्वतःच्या ट्विटचे समर्थन केलं असून, आपण या गंभीर विषयाकडे पक्षाध्यक्षांचे लक्ष वेधू इच्छितो असं त्यांनी स्पष्टं केलं आहे.

काय आहे ते ट्विट;

हॅशटॅग्स

#Amit Shah(262)#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x