19 April 2024 6:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

जळगावात कुछ बडा होने वाला है नंतर, मी नाथाभाऊ समर्थक कॅम्पेन जोरात

Eknath Khadse

जळगाव , ०९ जुलै | BHR प्रकरणाची सूत्रे जोरात फिरू लागताच आ.गिरीश महाजन गटाकडून ‘कुछ बडा होनेवाला हैं’ असे संदेश समाज माध्यमांवर फिरत होते. आठवडाभरात एकनाथराव खडसेंच्या मागे ईडी लागली आणि खडसे समर्थक मैदानात उतरले. खडसे समर्थकांकडून जोरदार सोशल मिडिया कॅम्पेन केले जात असून ‘मी नाथाभाऊ समर्थक’चे वॉलपेपर व्हायरल केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामागे ईडीची चौकशी लागली आहे. खडसेंची जावई गिरीश चौधरी यांना ताब्यात घेतल्यानंतर खडसे गुरुवारी चौकशीसाठी हजर झाले होते तर खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करते वेळी खडसेंनी ‘तुम्ही ईडी लावा, मी सीडी लावतो’ असे वक्तव्य केले होते.

काही दिवसांपूर्वी खडसे व स्व.नरेंद्र अण्णा पाटील गटाकडून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार असल्याचे प्रकरण उघड केले जात होते. त्यातच बीएचआर प्रकरणी शोध पथकाने अचानक अनेकांची धरपकड केली त्यातही गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय यांचा समावेश होता. एकंदरीत या सर्व घडामोडीपासून गिरीश महाजन हे लांब असले तरी त्यांच्या जवळील काही लोक ‘कुछ तो बडा होने वाला है..’ हा संदेश सोशल मीडिया पसरवत होते. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या या पोस्टनंतर खडसे कुटुंबाच्या मागे ईडी चौकशी लागली. त्यामुळे त्या पोस्टचा अन्वयार्थ तोच असल्याचा अंदाज आता लावण्यात येत आहे.

दरम्यान, ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथराव खडसे यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीही खडसेंची पाठराखण केली आहे. दरम्यान, खडसे गटाकडून ‘मी नाथाभाऊ समर्थक’ अशा आशयाचे वॉलपेपर सोशल मीडियात व्हायरल केले जात असून काही झाले तरी आम्ही खडसेंसोबत असल्याचे समर्थक दाखवून देत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Social media campaign in Jalgaon for support of NCP leader Eknath Khadse news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x