24 April 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल
x

पटेल आरक्षण, गुजरात मेहसाणा येथील हिंसाचार प्रकरणी हार्दिक पटेलला २ वर्षांची शिक्षा

अहमदाबाद : गुजरातमध्ये २०१५ साली झालेल्या पटेल आरक्षण आंदोलनावेळी मेहसाणा येथील हिंसाचार प्रकरणी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आणि इतर दोघांना विसनगर जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या निर्णयादरम्यान न्यायालयाने इतर १४ जणांना दोषमुक्त ठरवलं आहे. जुलै २०१५ मध्ये भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात प्रचंड हिंसाचार उफाळून आला होता आणि त्यावेळी आक्रमक आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ तसेच तोडफोड केली होती. त्यावेळी पटेल आरक्षण आंदोलनामुळे गुजरातमधील वातावरण खूप तापले होते तसेच राज्यसरकार विरोधात प्रचंड रोष उफाळून आला होता.

त्या मेहसाणा हिंसाचार प्रकरणी दोन वर्षांनी न्यायालयाचा निकाल आला आहे जो पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या विरोधात गेल्याने गुजरातमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x