14 December 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला मोठा प्रतिसाद | महाराष्ट्रात स्वाभिमानीचा रेल रोको

Farmers, Bharat Bandh, New Agriculture Law

मुंबई, ८ डिसेंबर: केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली (Farmers today (December 8) have called Bharat Bandh to protest against three agricultural laws) आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.

बँक संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे, मात्र बंदमध्ये सहभागी नसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बँक कर्मचारी कामाच्या वेळी हातावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवणार आहेत. तर बँक सुरु होण्याआधी किंवा नंतर आंदोलन करतील. ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

जवळपास सर्व व्यवसायिक वाहतूक, ट्रक संघटना बंदमध्ये सहभागी होणार असून यामुळे दूध, फळं आणि भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. दादरमध्ये सर्व दुकाने, बाजार बंद आहेत. शिवसेनेकडून बोर्ड लावत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्य़ासाठी जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

आजच्या भारतबंदला महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रेल्वे आडवली होती. यानंतर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ट्रॅकवरून हटवले आणि ताब्यात घेतले.

पुण्यातील APMC मार्केट (Pune APMC Market) खुले, ट्रेडर्स म्हणाले आमचं शेतकऱ्यांना समर्थन आहे. मात्र, आज आम्ही बाजारपेठ सुरूच ठेवणार आहोत. जेणेकरून इतर राज्यांतून येणारा शेतकऱ्यांचा माल साठता यावा अन्यथा तो कुजेल. तो उद्या विकला जाईल, असे स्थानिक व्यापारी सचिन पायगुडे यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: Farmers today (December 8) have called Bharat Bandh to protest against three agricultural laws imposed by the central government. Many organizations, including farmers and opposition parties across the country, have responded spontaneously and a strict bandh will be observed in Maharashtra as well. Most of the agricultural produce market committees in the state will remain closed on the backdrop of the closure. Mathadi workers will also participate in the strike. ST service is closed on sensitive route. People have been cooperating in the call of these farmers since morning.

News English Title: Farmers Bharat Bandh reaction in all over India including Maharashtra state news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x