20 September 2021 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त सोमैयांकडून आरोप पर्यटनाला धार्मिक रंग | गणेश विसर्जनापासून रोखलं, हिंदूला रोखलं, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखल्याची बोंब किरीट सोमैयांची 'आरोप पर्यटन यात्रा' कराडमध्येच संपली | पत्रकार परिषदेची शक्यता Health Benefits of Custard Apple | सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे | नक्की जाणून घ्या Health Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा
x

सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षेसाठी धोकादायक ५२ चिनी अ‍ॅप्सची यादी सरकारकडे

Chinese mobile apps

नवी दिल्ली, १८ जून: चिनी मोबाईल अँप सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. भारतापासून ते अमेरिकेपर्यंत सगळ्याच गुप्तचर संस्थांनी प्रत्येकवेळी चिनी अँप विरोधात आगपाखड केली आहे. आता भारतीय गुप्तचर संस्थेनेही भारत सरकारला ५२ चिनी अँप ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच, हे अँप तत्काळ डिलेट मारण्याचे आवाहन वापरकर्त्यांना करण्यात आलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या या यादीला आणि या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने पाठिंबा दर्शवला आहे. ही अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सरकारला कळवण्यात आल्याचं, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यावर सध्या चर्चा सुरु आहे,” असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. प्रत्येक अ‍ॅपशी संबंधित धोके आणि त्याचा धोक्यांचा अंदाज कसा बांधता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती सरकारला देण्यासंदर्भात काम सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या मते, चिनी मोबाईल अँप सुरक्षा आणि प्रायव्हसीसाठी अत्यंत हानीकारक आहे. या अँप्सच्या माध्यमातून मोबाईल युजर्सचा डेटा चीनच्या काही सर्वर पोहोचवला जात आहे. गुप्तचर संस्थेने सरकारला जी लिस्ट पाठवली आहे त्यात, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अँप जूम, शॉर्ट व्हिडिओ टीकटॉक, युसी ब्राऊजर, जेंडर, शेअररीट, क्लिन मास्टर सारखे अँप आहेत.

 

News English Summary: Chinese mobile apps have been proven to be dangerous in terms of security. From India to the US, all the intelligence agencies have been firing on the Chinese amp every time. Now the Indian intelligence agency has also instructed the Indian government to block 52 Chinese

News English Title: Chinese mobile apps have been proven to be dangerous in terms of security News Latest Updates.

हॅशटॅग्स

#China(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x