1 December 2022 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या Talathi Bharti 2022 | राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती, त्वरित ऑनलाइन अर्ज करा PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा Penny Stock | अपना सपना मणी मणी! या पेनी शेअरने 50 हजारावर 5 लाख परतावा दिला, अजून 35 टक्के वाढणार, नोट करा Quant Mutual Fund | तुम्हाला पैसा 5 पट करायचा आहे? क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 योजना सेव्ह करा, व्हा श्रीमंत
x

'लिट्टी चोखे'वर प्रेम उफाळून आलं आहे; बघा बिहारमध्ये निवडणूक नाही ना? रुचिरा चतुर्वेदी

Ruchira Chaturvedi, Congress, PM Narendra Modi

पटना: एखाद्या राज्यात निवडणूक आली की त्या राज्यातील एखाद्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या लोकप्रिय गोष्टींना प्रसिद्धीचं माध्यम बनवतात. आजवर त्यांनी असे प्रयोग केले आहेत आणि अजूनही तेच प्रकार सुरु असल्याचं दिसत आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर मोदी-शहांची पूर्ण हवाच निघून गेली आहे. त्यात बिहार आणि प. बंगालच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत.

त्यामुळे याच दोन राज्यातील लोकप्रिय गोष्टी मोदींच्या रडारवर असतील आणि त्याला ते समाज माध्यमांवरून प्रसिद्धी देतील अशीच शक्यता आहे. त्यातील एका प्रकारची खिल्ली उडवली आहे काँग्रेसच्या आयटी सेलच्या पदाधिकारी रुचिरा चतुर्वेदी यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील हुनरहाट भेटी संबंधित एका खाद्य पदार्थांच्या मेळाव्यातील मोदींनी ट्विट केलेल्या फोटोंवर गमतीशीर ट्विट केलं आहे.

त्यावर त्यांनी म्हटलं आहे की, ‘सध्या बिहारच्या ‘लिट्टी चोखे’वर प्रचंड प्रेम उफाळून आलं आहे, बघा जरा बिहारमध्ये निवडणूक नाही ना? असं म्हणत मोदींचा हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याचं म्हटलं आहे. ‘लिट्टी चोखे’ हा बिहारमधील प्रचंड लोकप्रिय खाद्य पदार्थ असून खवैयांमध्ये तसेच बिहारी लोकांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय असणारा खाद्य पदार्थ आहे. त्या अनुषंगाने रुचिरा चर्तुवेदी यांनी खोचक टोला लगावला आहे.

काय आहे ते नेमकं ट्विट;

Web Title: Story Congress Social Media Expert Ruchira Chaturvedi criticized PM Narnedra Modi over Bihar Upcoming Assembly Election.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x