27 July 2021 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

विखे पाटलांचं नवं संपर्क कार्यालय; ना भाजपचा झेंडा ना नेते

Story BJP, Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर : विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भारतीय जनता पक्षाची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्ष आमदार आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल आपल्या श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भारतीय जनता पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. विखे पाटल यांनी स्वत: कार्यालयाचे उद्घाटन केलं. काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी मिळवली होती.

परंतु, राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता न आल्याने कदाचित त्यांचा हिरमोड झाला आहे. श्रीरामपूर येथे विखे पाटलांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र भारतीय जनता पक्षाचा झेंडा कुठेही दिसला नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

 

Web Title: Story No BJP flag at Radhakrishna Vikhe Patils Nagar Shrirampur office.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(650)#Congress(500)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x