20 September 2021 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त सोमैयांकडून आरोप पर्यटनाला धार्मिक रंग | गणेश विसर्जनापासून रोखलं, हिंदूला रोखलं, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखल्याची बोंब
x

कोण अमृता फडणवीस? | नावडतीचं मिठ अळणी - किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar

मुंबई, ०५ ऑगस्ट | राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या सरकारचे मला कोणते काम जास्त आवडले तर ते एकत्र येत एकमेकांची पाठ खाजवणे, अशी मिश्किल टिप्पणी करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारच्या कामगिरीवर टोला लगावला आहे. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी घडवलेल्या कलाकृती महोत्सवाचे उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक माजी आमदार मेधा कुलकर्णी, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आदी उपस्थित होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यात पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी महाराष्ट्र सरकारला टोला लगावला. केवळ चार टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही हे कळत नाही, असं त्या म्हणाल्या.

त्यांच्या या टीकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. तसंच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं सांगत त्यांनी हा विषय टाळलाय. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, असं देखील पेडणेकर म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, “लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. पत्रकार हा कोरोना संकटाच्या काळात पुढे राहून काम करत होते. त्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास मिळायला हवा, असं मतही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय.

महाविकास आघाडी सरकार कधीही पडेल:
माविआ सरकार विक आहे. हे केव्हा पडेल माहीत नाही. जे नेते आज दिल्लीत भेटत आहेत, ते आधीपासूनच भेटत आहेत. अचानकपणे त्यांची भेट होत नाहीये. या भेटीवरून निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

महाराष्ट्राचे ‘राज्यपाल निष्ठावंत’राज्यपालांसारखे निष्ठावंत, कर्तृत्ववान व्यक्ती मी कधीही पाहिलेला नाही. राज्यपालांच्या दौऱ्याला जे विरोध करत आहेत, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नाहीत, म्हणून राग आहे. पण असे व्हायला नको, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai Mayor Kishori Pednekar criticized Amruta Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x