27 April 2024 3:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
x

चुकलेल्या API वर कारवाई होईल | राज्यात अनेक कर्तव्यदक्ष API | पोलिसांचं मनोबल वाढवणं महत्वाचं - गृहमंत्री

Home minister Sachin Vaze, Police officer, Anil Deshmukh

मुंबई, १८ मार्च: मुंबईतील सध्या मुंबई पोलीस दलातील निलंबित करण्यात आलेले API सचिन वाझे यांच्यामुळे देशभरात प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांना टीका सहन करावी लागत आहे. याच मुंबई पोलिसांना मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा लोकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव देताना सामान्य लोकांनी पाहिलं आहे. आजही ती कटू आठवण आठवली तरी प्रथम नाव येतं मुंबई पोलिसांचं हे सत्य आहे. अगदी सध्याच्या कोरोनाच्या लढ्यातही पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे.

याच मुंबई पोलिसांमधील निलंबित API सचिन वाझे यांच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जरी शहर पोलिसांची मान खाली गेली असली तरी आजही अनेक API दर्जाचे अधिकारी राज्य आणि शहरातील सामान्य लोकांसाठी जीवाची बाजी लावून कर्त्यव्य निभावत आहेत. आता राज्याचे गृहमंत्री देखील पोलिसांचं मनोबल वाढवताना दिसत असून, जे भरकटले त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करून त्यांना प्रोत्साहित करावं असं आवाहन करत आहेत.

यानिमित्ताने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक किस्सा सांगितला की, कोरोना काळात जून महिन्यात निसर्ग वादळाचा तडाखा बसणार होता. रस्त्यावर कोणीही उतरलं नव्हतं. त्यावेळी ए पॉसिटीव्ह रक्ताची तातडीने हिंदुजा रुग्णालयात गरज होती. लहान मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी हे रक्त हवे होते. त्यावेळी ताडदेव पोलिस ठाण्याच्या API आकाश जाधव मदतीसाठी धावून गेले आणि ए पॉसिटीव्ह रक्तदान केले. त्यामुळे लहान मुलीवर हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. तर कोरोना जास्त प्रादुर्भाव असतानाच्या काळात नातेवाईक देखील मृतदेहाला पाहायला येत नव्हते. शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस संध्या शिलावंत यांनी कोरोना काळात सहा कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. ही बाब कौतुकास्पद आहे याची आठवण त्यांनी करून दिली.

जरा या API कडे लक्ष द्या आणि सकारात्मक राहून आपल्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची मान देशात ताठ राहिला याची काळजी घेऊ;

 

News English Summary: The Mumbai Police, which is currently well-known across the country, has come under fire for its suspended API Sachin Waze from the Mumbai Police Force. Ordinary people have seen the same Mumbai police giving their lives for the safety of the people when the terrorist attack on Mumbai took place. Even today, even though she remembers the bitter memories, the first name that comes to mind is the truth of Mumbai Police. Even in the current Corona fight, the police have a lion’s share.

News English Title: Home minister Sachin Vaze highlighted good police officer work to encourage them news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x