14 November 2019 1:03 PM
अँप डाउनलोड

हवाई दलाची जवानांसाठी जुनी विमाने; जीव गमावलेल्या वैमानिकाच्या भावाचा संताप

नवी दिल्ली : मागील आठवड्यात बंगळुरु येथे मिराज २००० या लढाऊ विमानातून सराव करते वेळी विमानाचा अपघात होऊन स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल आणि सिद्धार्थ नेगी या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा मंगळवारी इंदापूर तालुक्यात कार्वर विमानाला अपघात होऊन सिद्धार्थ हा वैमानिक जखमी झाला. यानंतर या अपघातांबद्दल वादळ उठले आहे. प्रशिक्षण देताना किंवा सरावासाठी हवाई दलाच्या वैमानिकांना व इतर वैमानिकांना जुनी लढाऊ विमाने दिली जातात, ज्यामुळे त्यांचे जीव धोक्यात असतात अशी तक्रार चहूबाजूंनी होत आहे.

स्क्वॉड्रन लीडर समीर अब्रोल याचा भाऊ सुशांत याने सोशल मिडीयावर आपल्या मनातील संताप व्यक्त केला. सुशांतने म्हटले आहे की, ‘हे दोघेजण उत्तम वैमानिक होते. दोघांचे लढाऊ वैमानिक म्हणून प्रशिक्षण पूर्ण झाले होते पण त्यांना जुनाट विमान दिले आणि त्यामुळे त्यांचे प्राण गेले. हे विमान नुकतेच एचएएल कंपनीने दुरुस्त करून पाठविले होते. पण त्यात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने ते कोसळले. आपल्या जवानांना जुनाट विमाने द्यायची आणि अधिकार्‍यांनी चीज अन् वाईनची मजा घेत राहायचे हे योग्य नाही. केवळ मतांची चिंता न करता भ्रष्टाचारामुळे जे प्राण जात आहेत त्यांचीही चिंता केली पाहिजे.

हॅशटॅग्स

#IndianArmy(14)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या