6 May 2024 10:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार
x

सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न, पण आम्ही सुद्धा बघून घेऊ - राऊतांच्या इशारा

ED summons

मुंबई, २६ जून | अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आले असून, आता देशमुख यांना समन्स बजावण्यात आलं आहे. याप्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत भाजपावर चांगलेच भडकले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून, यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले,”बघावं लागेल. कालच बघितलं की, त्यांच्या घरांवर आणि कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. शरद पवार यांनी कालच सांगितलं की, ‘निराशेतून हे केलं जात आहे. काही लोकांच्या मनात निराशा आहे. सरकार बनवू शकलो नाही, या अपयशामुळे नैराश्य आलेलं आहे.’ शरद पवार अगदी बरोबर बोलले. त्याच आधार सरकारमध्ये असलेल्या पक्षातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करून शकते. पण, महाराष्ट्रातील मंत्री असोत की, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमदार, सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न, पण आम्ही बघून घेऊ,” असं संजय राऊत म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विनाकारण त्रास देण्याचं हे काही नवं प्रकरण नाही. काल शरद पवार देखील याबाबत बोलले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार असोत किंवा मग शिवसेनेचे सर्वांना विनाकारण त्रास दिला जात आहे. पण महाविकास आघाडी भक्कम आहे. आम्ही बघून घेऊ”, असा रोखठोक इशारा

देशात भारतीय जनता पक्षाला पर्याय देणारी भक्कम आघाडी निर्माण करायची असेल तर काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होऊ शकत नाही, असं विधान मी या आधीही केलं होतं. शरद पवार यांनीही आता तीच भावना व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष देशातील मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला आव्हान निर्माण करायचं असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच आघाडी तयार होऊ शकेल”, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: ED summons to former home minister Anil Deshmukh Shivsena Leader Sanjay Raut Reaction Maharashtra Politics news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x