27 June 2022 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Labour Code | कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 4 दिवस काम, 3 दिवस विश्रांती | 1 जुलैपासून नियमांची अंमलबजावणी होणार? Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार Zomato Share Price | झोमॅटोच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा | 100 टक्के मल्टिबॅगर रिटर्न कमाई होईल नवाब मलिक मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी नव्हते | संजय दत्त होता | भाजपच्या स्क्रिप्टवर शिंदेंच्या जनतेला टोप्या Aadhaar Card | तुमच्या आधार कार्डशी संबंधित हे काम 3 दिवसांत करा | अन्यथा मोठे नुकसान होईल Investment Planning | एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील | पॉलिसीचे तपशील जाणून घ्या
x

मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात | सुशांतच्या वडिलांकडून कोर्टात प्रतिज्ञापत्रही सादर

Mumbai Police, Rhea Chakraborty, Sushant Singhs Father, Supreme Court

मुंबई, ०९ ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती मुख्य आरोपीच्या जाळ्यात अडकल्याचे दृष्य समोर येत आहे. या प्रकरणी ईडीने रियाची तब्बल ८ तास चौकशी केली. त्यानंतर आता तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ईडीकडून शोविकची देखील चौकशी करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ईडी कडून चौकशी करण्यात ही चौकशी जवळपास १८ तास सुरू होती.

१८ तासांच्या चौकशीनंतर शोविक ईडी कार्यालयाच्या बाहेर आहे. शनिवारी रात्री ११ च्यासुमारास ईडीकडून त्याची चौकशी सुरू होती. यावेळी मनी लांड्रिंग संबंधित शोविकची चौकशी सुरू होती. शोविक नंतर रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात येईल.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा सुशांतच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञा पत्र सादर केलं. दरम्यान या प्रकरणी आता काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला आहे.

सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला या आशयाचं एक प्रतिज्ञापत्र सुशांतच्या वडिलांनी कोर्टात दाखल केलं आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर इतरही आरोप केले होते. फेब्रुवारी महिन्यातच सुशांतच्या जिवाला धोका आहे अशी तक्रार मी नोंदवली होती असा दावा सुशांतच्या वडिलांनी केला होता. मात्र अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आता या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप करत ते रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Sushant Singh’s father has once again made serious allegations in the Rajput death case. He has alleged that Mumbai police are trying to save Riya Chakraborty in Sushant’s death case. Mumbai Police filed an affidavit in the Supreme Court on Saturday.

News English Title: Mumbai Police Trying To Shield Rhea Chakraborty Says Sushant Singhs Father News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x