22 September 2023 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी? Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?
x

Pune & Pimpri Chinchwad SRA | पुणे, पिंपरी-चिंचवड मधील झोपडीधारकांना ३०० चौ.फुटांचा फ्लॅट मिळणार | पालकमंत्र्यांची घोषणा

SRA

पुणे, २९ सप्टेंबर | राज्य सरकारने पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर (Pune and Pimpri Chinchwad SRA) मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. आता मुंबई मध्ये पुणे आणि पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळणार आहेत.

Slum dwellers in Pune and Pimpri-Chinchwad area will get 300 square feet house. This provision was made in the draft revised regulations approved by the state government for the slum rehabilitation project. Pune and Pimpri Chinchwad SRA :

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारित बांधकाम नियमावलीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे . त्यानंतर नियमावलीचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान यावर नागरिकांचे मत काय आहे याबद्दल माहिती घेतली गेली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमात अनेक बदल करण्यात आले होते. यामध्ये झोपडीधारकांना २६९ चौरस फुटांऐवजी ३०० चौरस फूट घर मिळेल. यासाठी केवळ ५१ टक्के लोकांनी सहमती दिली असली तरी ही योजना राबवण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रलंबित आहेत. शहरांमध्ये सुमारे ६०० झोपडपट्ट्या आहेत. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयामुळे दोन्ही शहरे झोपडपट्टीमुक्त होण्यास चालना मिळू शकेल. ३०० फुटांचे घर मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा नागरिकांना फायदा होईल. अजित पवार यांनी घर धारकांना नव्या घरात प्रवेश करुन चांगल्या जीवनाची सुरुवात करण्याचा सल्ला दिला. ज्यांना घर मिळणार आहे त्यांनी ते विकण्याचा विचार करू नये. तुम्हाला सगळ्यांना सन्मानाने जगता यावे, म्हणून ही योजना आणण्यात आली आहे.

अजित पवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी मला पुण्याचा पालकमंत्री होण्याची संधी दिली आहे .पुणेकरांच्या नावाला धक्का लागता कामा नये.तसेच पुण्यातील मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. सहकार भवन, कामगार भवन, कृषी भवन पुण्यात निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pune and Pimpri Chinchwad SRA scheme approved 300 square feet flat to slum owner.

हॅशटॅग्स

#SRA(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x