28 March 2023 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | थेट 50 लाख रुपयांचा फायदा देणारी पोस्ट ऑफिसची योजना, फायद्यासह योजनेचा तपशील जाणून घ्या Income Tax Return | पगारदारांसाठी मोठी बातमी, गुंतवणूक न दाखवता इन्कम टॅक्समध्ये 50 हजाराची सूट मिळणार LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार
x

Pune Rain | भाजपाची सत्ता असलेल्या पुण्यात पावसामुळे रस्त्यांचे कालवे, तर घरं, इस्पितळ आणि मंदिरातही शिरलं पाणी

Pune Rain

Pune Rain | परतीचा पाऊस राज्यभरात बसरत आहे. पुण्यातही पावसाने चांगलीच बॅटिंग केली. सोमवारी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बसरल्या. शहरामध्ये तर रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी शिरले. साडे नऊ वाजेच्या सुमारास धुव्वादार पाऊस सुरु झाला होता. यामुळे रस्त्यांनाही नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर भागांतील तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागला.

पुण्यातील दगडूशेठ मंदिरातही पाणी
पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडुशेठ हलवाई मंदिरामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून रात्री उशारीपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु होते. यासोबतच श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टला देखील फटका बसला. येथील संग्रहालयामध्ये देखील पाणी शिरले. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्वती येथील रमणा गणपतीजवळ भिंतीचा काही भाग कोसळला. शहरातील अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनांमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.दुचाकीवर झाड पडल्यानं एक जण जखमी झाल्याची घटनाही घडलीये. त्याच दरम्यान तब्बल 12 नागरिक पावसात अडकून पडले होते. त्या सर्वांची सुटका अग्निशामक विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली. तसेच हडपसर, आकाशवाणी, चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. या घटनेतील जखमी दुचाकी चालकास तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मंगळवार पेठ स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब 5 जण पाण्यात अडकले होते. तर कोंढवा खुर्द येथील भाजी मंडई लगत असलेल्या एका ठिकाणी 7 नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना यश आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pune Rain made infrastructure collapsed check details 18 October 2022.

हॅशटॅग्स

#Pune Rain(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x