26 May 2024 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 27 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 27 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budhaditya Rajyog 2024 | बुधादित्य राजयोग, 3 राशींचे नशीब चमकणार, पैसा संपत्तीसाठी अत्यंत शुभं काळ ठरणार SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Audio Viral | बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल नांदगावकरांनी अपशब्द वापरले, मनसे कार्यकर्त्यानेच झापताना लायकी काढली, ऑडिओ व्हायरल

Shivsena

Audio Video | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरांनी कार्यकर्त्यासोबत केलेल्या संवादाची कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झाली आहे. औरंगाबाद मधील कार्यकर्त्यानं शिवसेना, उद्धव ठाकरेंचं नाव घेताच नांदगावकरांची कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे बाळा नांदगावकरांनी बाळासाहेंबानी स्थापन केलेल्या शिवसेनेबद्दल अपशब्द वापरल्याचा त्यात स्पष्ट होतंय. शिवसेनेच्या ऋतुजा लटकेंनाच निवडून येऊद्या असं म्हणताच “शिवसेनेचं कौतुक मला नको सांगू, उद्धव ठाकरेंना राजसाहेबांनीच कित्येकदा मदत केली” असं म्हणत नांदगावकरांनी कार्यकर्त्याला झापलं.

तसेच “दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न केले पण उद्धव ठाकरे राजसाहेबांचा द्वेष करतात त्यामुळे शिवसेनेलाच मनसे नकोय” अशी खंत व्यक्त करत कार्यकर्त्याला सुनावलं आहे. मात्र कार्यकर्त्यासोबत संवाद करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल अपशब्द वापरताच हा कार्यकर्ता सुद्धा संतापल्याच स्पष्ट ऐकू येतंय.

या रमेश पाटील नावाच्या कार्यकर्त्याने बाळा नांदगावकर यांना सुद्धा झापताना सुनावलं. अहो ओरडू नका, शिव्या नको देऊ, असं सेनेबद्दल अशा शब्दात बोलू नका असं सुनावलं. शिवसेनेला शिव्या द्यायला नको, महादेव – शिवाजी महाराज आहे असं कार्यकर्त्याने झापताच आणि कॉल रेकॉर्ड करत असल्याचं समजताच बाळा नांदगावकर नरमले असं सुद्धा ऐकू येतंय. त्यानंतर ते आपण द्वेष का करतो यावर ते स्पष्टीकरण देताना ऐकू आहेत. एवढच नव्हे तर, राज साहेब असे शब्द काढत नाहीत आणि तुम्ही कुठे शिवसेनेची आई-बहीण काढता. तुमच्या औकादीत राहा असा सज्जड दम सुद्धा कार्यकर्त्याने बाळा नांदगावकरांना भरला. तसेच तुमच्यामुळेच हे दोन भाऊ सोबत येतं नाही असं वाटतंय आता. एकूण या कार्यकर्त्याने शिस्तीत बाळा नांदगावकर यांना झापलं असं ऐकू येतंय. ही क्लिक प्रचंड व्हायरल होताना दिसतेय.

Audio Credit – Maharashtra Times

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Leader use bad words against Shivsena Party call recording viral check details 18 October 2022.

हॅशटॅग्स

#Bala Nandgaonkar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x