8 June 2023 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली Numerology Horoscope | 09 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर पटापट तपासून घ्या Dynacons Systems Share Price | डायनाकॉन्स सिस्टीम्स शेअरने मालामाल केले, 3 वर्षात 2450 टक्के परतावा दिला, खरेदी करणार? Graphite India Share Price | 3.50 रुपयाच्या ग्रेफाइट इंडिया शेअरने 10636% परतावा दिला, तज्ज्ञांचा पुन्हा हा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस? Guru Rashi Parivartan | पुढील एक वर्ष या राशींवर राहील देव गुरूंचा आशीर्वाद, फायद्याच्या अनेक शुभं घटना घडतील RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?
x

Shirdi Airport | शिर्डी विमानतळाजवळ सर्व सुविधांयुक्त शहर वसवणार | मुख्यमंत्र्यांची मंजुरी

Shirdi airport

मुंबई, ३० सप्टेंबर | विमानतळाच्या (Shirdi Airport) सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. बुधवारी ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.

CM Uddhav Thackeray suggested that Shirdi should be selected to develop a city with all facilities by developing the area around the airport (Shirdi Airport) and also to build a good development center in Maharashtra :

वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती. एरिया अराउंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच ‘आशा’ असे या भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, शिर्डी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी येथे देश-विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. शिर्डी विमानतळ व सभोवतालच्या परिसराचा विकास झाल्यास तेथे विविध प्रकल्पांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि हे राज्यातील उत्तम विकास केंद्र बनेल. रोजगार निर्मिती होईल व विमानतळ परिसरात पायाभूत सुविधा निर्माण झाल्याने पर्यटन व्यवसाय आणखी वृद्धिंगत होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

विमानतळाचा विकास व्हावा:
केवळ विकासाच्या नावाखाली विमानतळ सुरू करून त्याचा विकास करण्यात येऊ नये. जेथे औद्योगिक विकास होऊ शकेल, पर्यटनाला चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशा भागात विमानतळ उभारणी आणि त्याचा विकास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Shirdi airport infrastructure will develop said CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x