2 May 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Multibagger Stocks | हे शेअर्स गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहेत, गुंतवणूक 4 ते 5 पट वाढते आहे, हे नफ्याचे शेअर्स लक्षात ठेवा

Multibagger Stocks

Multibagger Stocks| शेअर बाजारात सर्वानाच पैसे कमवायचे आहेत,त्यातले बरेच लोक जोखीम पत्करून पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात, आणि जबरदस्त नफा कमावतात. तुम्ही ही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पैसे गुंतवणूक करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला अशा जबरदस्त शेअर्सची माहिती देणार आहोत ज्याने एका वर्षात तब्बल 4 पट परतावा दिला आहे.

जर तुम्ही थोडीफार जोखीम पत्करून मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पैसे लावण्यास तयार असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार वर्षभरानंतर चांगलाच तेजीत आलेला दिसत आहे. आज आपण असे काही स्टॉक्स पाहणार आहोत ज्यांनी फक्त 1 वर्षात दोन ते चार पट नफा कमावला आहे. या शेअर्समध्ये पैसे लावणारे लोक एका वर्षभरात मालामाल झाले आहेत. यादरम्यान सेन्सेक्समध्ये 5.5 टक्के वाढ झाली असून, निफ्टीमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एका वर्षात भरघोस परतावा :
जर आपण मागील 1 वर्षाच्या आकडेवारीचे निरीक्षण केले तर सेन्सेक्समध्ये तब्बल 2,936 पॉइंट्स ची वाढ झालेली दिसत आहे. सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सपैकी 17 असे शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या भागधारकांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. निफ्टीमध्ये 815 अंकांची वाढ झाली असून आपल्या निफ्टी मधील 50 पैकी 28 शेअर्समध्ये हिरवळ पसरलेली दिसेल. पण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये फारशी वाढ झालेली दिसत नाही. मागील 1 वर्षात मिडकॅप निर्देशांक फक्त 3 टक्क्यांनी वाढला आहे. तर स्मॉलकॅप निर्देशांकात 9 टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे.

मिडकॅपमध्ये 4 पट परतावा : BLS इंटरनॅशनल :
मागील 1 वर्षात असे काही मिडकॅप शेअर्स आहेत ज्यांनी त्यांच्या भागधारकांना जबरदस्त नफा कमाई करून दिला आहे. यामध्ये पैसे लावणाऱ्याना सध्या 4 पट अधिक नफा झालेला आहे. BLS इंटरनॅशनल कंपनीचा शेअर मिडकॅपमधील सर्वोत्तम कामगिरी करणारा शेअर आहे. या शेअर ने खूप कमी काळात 282 टक्के चा एकूण परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक फक्त एका वर्षात जवळपास 4 पट वाढली आहे.

स्मॉलकॅपमध्ये 3 पट परतावा : मिर्झा इंटरनॅशनल कंपनी :
मागील वर्षभरात स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त कामगिरी केली होती. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना तब्बल 3 पट पेक्षा जास्त नफा मिळाला आहे. स्मॉलकॅपमध्ये समाविष्ट असलेल्या मिर्झा इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरमध्ये मागील वर्षभरात 338 टक्क्यांची वाढ झाली आहे. आणखी एक स्मॉलकॅप शेअर TD Power Systems ने देखील आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्के परतावा कमावून दिला. म्हणजेच हा शेअर खरेदी करणाऱ्यांची गुंतवणूक रक्कम अक्षरशः तिपटीने वाढली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks in small cap and mid cap index given huge return on 22 August 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x