14 September 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News
x

Tarbuj of Maharashtra | सर्व एका टरबूजामुळे झाले | तो कोण ते गुगलवर जाउन टरबूज ऑफ महाराष्ट्र सर्च करा

Tarbuj of Maharashtra

जळगाव , ०४ ऑक्टोबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे एका स्थानिक कार्यक्रमानंतर पुन्हा चर्चेत आहेत. जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना (Tarbuj of Maharashtra) त्यांनी ‘हम तो डूबे है सनम तुमको भी लेकर डूबेंगे’ अशा शायराना शैलीत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच आपण ईडीला घाबरत नाही ईडीचा विषय आता संपला. प्रकरण कोर्टात असल्याने कोर्टाला मात्र घाबरतो असे खडसे यांनी म्हटले आहे.

Tarbuj of Maharashtra. Go and search on google who is Tarbuj of Maharashtra then see what information will google show said NCP leader Eknath Khadse :

जळगावात एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना खडसे म्हणाले- “सत्तर वर्षांचा झालोय. सत्तराव्या वर्षी कशाला? कशासाठी हे लोक माझी बदनामी करत असतील? हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे.” यासोबतच आता आपण भाजप नाही तर राष्ट्रवादीमध्ये आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला किती पाठिंबा आहे हे देखील खडसेंनी यावेळी बोलून दाखवले आहे.

गुगलवर जाउन टरबूज कोण सर्च करा:
भाजपमध्ये कोण-कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव कसा केला हे मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर कळाले. इथले आमदार कुणाच्या बळावर निवडून आले. तरीही कुणाचे तरी ऐकून नाथाभाऊंच्या मागे कधी आयटी, अँटी करप्शन तर कधी ईडी लावायची. नाथाभाऊंच्या घरावर रेड टाकून सुद्धा काहीच हाती लागलेले नाही. न्यायालयातही क्लोजर रिपोर्ट दिला. तरीही ईडी लावण्यात आल्याचे सांगितले जाते. एकाच माणसाच्या सांगण्यावरून हे सर्व करण्यात आले. तो कोण माहिती आहे का? गुगलवर जाउन टरबूज ऑफ महाराष्ट्र असे सर्च करा सापडेल.

ईडीच्या मुद्द्यावर बोलताना खडसेंनी सांगितले, माझ्या जावयाचा काहीच संबंध नसताना त्याचे नाव टाकण्यात आले. आता ईडी (अंमलबजावणी संचलनालय) चा मुद्दा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. आता हे प्रकरण कोर्टात गेले असून कोर्टाला मात्र आपण घाबरतो. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रवादी पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

एकीकडे, एकनाथ खडसे भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडीच्या चौकशीमुळे अडचणीत आहेत. आता हे प्रकरण कोर्टात असले तरीही राष्ट्रवादी आपल्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे 2017 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार आहे. या प्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Tarbuj of Maharashtra search on google said Eknath Khadse.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x