Mandakini Khadse in ED Office | मंदाकिनी खडसे चौकशीसाठी ईडी कार्यालयात, पण ED कार्यालय बंद
मुंबई, १९ ऑक्टोबर | पुण्यातील भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई हायकोर्टाने मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्या ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. परंतु, ईडीचे कार्यालय बंद असल्याने त्यांनी परत (Mandakini Khadse in ED Office) जावे लागले. पण त्या पुन्हा येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्या तपास यंत्रणेत पूर्ण सहकार्य करतील, अशी माहिती मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन तळेकर यांनी दिली.
Mandakini Khadse in ED Office. Mandakini Khadse, wife of former minister Eknath Khadse, was directed by the Mumbai High Court to appear before the ED on Tuesday and Friday in connection with the Bhosari plot scam. However, as the ED’s office was closed, they had to return :
पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले असता त्यांनी त्या विरोधात मुंबईच्या सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सत्र न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची सुनावणी करताना मंदाकिनी खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. त्यांना तूर्तास अटक करू नये, असे निर्देष न्यायालयाने ईडीला दिले होता.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Mandakini Khadse in ED Office over questioning in Bhosari land scam case.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा