23 September 2021 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

ईडीकडून खडसेंची मालमत्ता नक्की जप्त झाली? | महसूल विभागालाही माहिती नाही? - काय आहे प्रकरण

Eknath Khadse

मुंबई, २७ ऑगस्ट | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने जोरदार दणका दिल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खडसेंवर झालेल्या कारवाईबद्दल एकच चर्चा रंगली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ईडीकडून खडसेंची मालमत्ता नक्की जप्त झाली?, महसूल विभागालाही माहिती नाही?  – ED never confirmed about Eknath Khadse assets attached in money laundering case :

नक्की कोणती मालमत्ता जप्त?
भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची या प्रकरणात दोनवेळा चौकशी झाली आहे. यातच आज ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने देखील याबाबतचे वृत्त दिले आहे. पण ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेपैकी जळगावातील नेमक्या कोणत्या मालमत्तेचा समावेश आहे? याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही.

महसूल विभागही कारवाईबाबत अनभिज्ञ?
ईडीने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी प्रसार माध्यमांनी जळगाव आणि मुक्ताईनगर येथील तहसीलदारांशी संपर्क साधला. परंतु, त्यांनी महसूल विभागाकडे अशा स्वरूपाच्या कारवाईबाबतचे कोणत्याही प्रकारचे पत्र आलेले नाही. जप्त केलेली मालमत्ता देखील आपल्या कार्यक्षेत्रातली नाही, असे त्यांनी सांगितले.

ED स्वतः जप्तीची माहिती ट्विटरवर देतं:
एएनआय या वृत्तसंस्थेने देखील याबाबतचे वृत्त दिले आहे. पण ईडी विभाग त्यांच्याकडे असलेल्या प्रकारणांसंबंधित माहिती ट्विटरवर सार्वजनिक करतात. मात्र एकनाथ शिंदे यांच्या संबंधित म्हणजे मालमत्ता जप्तीचे कोणतेही ट्विट ईडी’ने केलेलं नाही.

तज्ज्ञांचा अंदाज:
प्रसार माध्यमांनी महसूल विभागातील जाणकार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जर समजा ईडीने शेतजमिनीशी संबंधित मालमत्ता जप्त केली असेल तर अशा स्वरूपाची कारवाई करण्यापूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतचे पत्र दिले जाते. जप्त होणाऱ्या मालमत्तेचा तपशील त्यात असतो. संबंधित मालमत्तेवर महसूल विभागाचा बोजा बसवला जातो. मात्र, घर, बँकेतील रोकड व इतर ऐवज अशा स्वरूपाची जप्ती असेल तर मात्र ईडी थेट कारवाई करू शकते, असेही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED never confirmed about Eknath Khadse assets attached in money laundering case.

हॅशटॅग्स

#ED(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x