30 May 2023 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

Non Bailable Warrant Against Eknath Khadse | मंदाकिनी खडसें आणि एकनाथ खडसेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी

Non Bailable Warrant Against Eknath Khadse & Mandakini Khadse

मुंबई, 12 ऑक्टोबर | पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. मंदाकिनी खडसेंनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने (Non Bailable Warrant Against Eknath Khadse & Mandakini Khadse) फेटाळला आहे. दरम्यान, या प्रकरणी एकनाथ खडसे हे आजही सत्र न्यायलयात हजर होऊ शकले नाही.

Non Bailable Warrant Against Eknath Khadse & Mandakini Khadse. Mumbai Sessions Court has issued a non-bailable warrant against Eknath Khadse’s wife Mandakini Khadse in the Pune land scam case. The court also rejected the bail application filed by Mandakini Khadse :

आज मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

एकनाथ खडसेंची सर्जरी झाली असून ते सध्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. अजून काही दिवस ते रुग्णालयातच राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच हजर राहण्यासाठी कोर्टाकडे आणखी वेळ मागितला आहे. न्यायालयाने खडसेंना उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी आता 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Non Bailable Warrant Against Eknath Khadse and Mandakini Khadse in Mumbai Sessions Court.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x