26 April 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

दिसतं तसं नसतं म्हणून जग? डेटा सुरक्षाबाबत प्रश्न फेसबुकबाबतीत सुद्धा आहेत...मग?

Jio, Facebook, TikTok

मुंबई, ३० एप्रिल: भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण जगभर चर्चा केवळ टिकटॉकवर का रंगली असावी? लडाखचा मुद्दा तर बहाणा ठरला पण तत्पूर्वी कोणता घटनाक्रम घडला होता?

फेसबूककडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली होती. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली होती. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला होता. जिओकडून देखील याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

या गुंतवणुकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सला मोठा फायदा झाला. त्यामुळे जिओ अँप प्लॅटफॉर्मचं मूल्य वाढून ४.६२ लाख कोटी रुपये झालं. या करारामुळे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजवरील कर्ज आणखी कमी होईल आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकला एक मजबूत प्लॅटफॉर्म मिळेल. फेसबुक आणि जिओ विविध प्रोजक्टवर एकत्रितपणे काम करणार आहे, ज्यामुळे देशभरात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असं दोन्ही कंपन्यांनी आपल्या वेगवेगळ्या जारी केलेल्या वक्तव्यांमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर अनेक विदेशी कंपन्यांनी जिओ मध्ये अरबो रुपयांची गुंतणूक केली आहे, पण त्यात चिनी कंपन्यांना स्थान नव्हतं.

मार्केट कॅपच्या हिशोबानं देशातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्स समूहानंने मागील 58 दिवसांत एकूण 1 लाख 68 हजार 818 कोटी कमावले आहेत. कंपनीने ही रक्कम राइट्स इश्यू आणि टेलिकॉम कंपनी असणारी रिलायन्स जिओमधील भागीदारीनं विकून कमावले आहेत. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी घोषणा करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, रिलायन्सनं जगभरातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकीदारांनी डिजीटल प्लॅटफॉर्ममध्ये केलेल्या गुंतवणूकीनंतर आणि शेअर विक्रीच्या माध्यमातून मार्च 2021च्या आधी कर्जमुक्त होण्याचे लक्ष पूर्ण केले आहे.

विशेष म्हणजे मुकेश अंबानी यांनी फेब्रुवारी महिन्यात चीनची मदत न घेता भारतात 5G सेवा लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. महत्वाचे म्हणजे यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः उपस्थित होते. यावेळी ट्रम्प यांनी मुकेश अंबानी यांचे अभिनंदनही केले होते. त्यानुसार जिओने स्वत: बनविलेल्या 5 जी नेटवर्कची ट्रायल घेतली जाणार आहे.

देशातील 5G सेवांतील Jio एक मुख्य दावेदार आहे, पण त्याला चीनच्या हुवै कंपनीकडून मोठी स्पर्धा आहे. सध्याच्या स्थितीवरून भारतातील 5Gचा लिलाव सध्या एक वर्षासाठी टाळण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षीच हुवैला 5G ट्रायलमध्ये सहभागी होण्याची परवानगी भारत सरकारकडून देण्यात आली होती.

याच हुवै कंपनीला अमेरिकेतील दूरसंचार क्षेत्रात दूर ठेवण्यासाठी अमेरिकेत मे 2021पर्यंत हुवैच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. काल म्हणजे सोमवारी मोदी सरकारमधील काही वरिष्ठ मंत्र्याची बैठक झाली. यात 5Gवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री पीयूष गोयल आदी सहभागी झाले होते. मात्र सध्याच्या हालचालीनुसार हुवैच्या संस्थापकांचे पीएलएसोबत संबंध असल्याचे कारण देत भारतात या कंपनीचे पंख छाटण्याच्या हालचाली केंद्रातून सुरु असल्याचं वृत्त आहे दिल्लीत आहे.

दुसरी बाजू म्हणजे मोबाइल आणि डेटा एनालिटिक्स फर्म App Annie च्या माहितीनुसार, अँड्रॉयड युजर्सने २०१८ मध्ये एकूण ९०० मिलियन (९ कोटी) तास टिकटॉकवर घालवले. त्यानुसार टिकटॉकने प्रतिस्पर्धी फेसबुकला मागे टाकले होते आणि फेसबुकला भारतात मोठी स्पर्धा निर्माण केली होती. त्यामुळे फेसबुकची चिंता वाढली होती. मात्र फेसबुकने Jioमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केल्याने TikTok विरुद्ध मोठं राजकीय अस्त्र सध्याच्या स्थितीचा फायदा घेत वापरलं गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण फेसबुकवर डेटा चोरीचे खटले अमेरिकेपासून इतर देशात देखील सुरु होते. तसेच युझर्सचा डेटा विकायचं वृत्त तर अमेरिकन माध्यमांनी दिली आहेत. तसेच भारतात देखील डेटा लीक प्रकरण प्रचंड गाजलं होतं. पण फेसबुकने डेटा सायन्सच्याआडून जिओमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केली आणि देशात स्वतःचे पाय भक्कम केले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेली तब्बल ६८७ पेज आणि अकाऊंट्स डिलीट केली होती. त्यानंतर फेसबुक कोणाच्या इशाऱ्यावर काम करतं आहे का याचा उलगडा अजूनही झालेला नाही.

 

News English Summary: Facebook had announced the purchase of 10 per cent stake in Reliance Industries Group’s Geo. Facebook has announced that it will invest ७ 5.7 billion, or Rs 43,574 crore, in Geo. The decision was taken by Facebook to further expand its reach in social media in India.

News English Title: Why Facebook has fears from TikTok fast journey News Latest Updates

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x