26 April 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली
x

शेतकऱ्यांनो, भाजपला दारात सुद्धा उभं करू नका: शरद पवारांचं आवाहन

NCP, Sharad Pawar, Maharashtra Vidhansabha 2019, Farmers poor condition

अहमदनगर: ‘भाजप सरकारला शेतीबाबत आस्था नाही. यांच्या राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली की यांनी कांदा निर्यातबंदी करून टाकली. या सरकारनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. त्यांना मतदानासाठी दारातही उभे करू नका,’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांना केलं.

भाजपाला शेतकरी आणि शेती यांच्याबाबत काहीही आस्था नाही त्यामुळे त्यांना दारात उभंही करु नका. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारं हे सरकार आहे त्यांना मतं देऊ नका असं आवाहन शरद पवार यांनी केलं. या सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले. सरकारच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले. लोकांचे रोजगार गेले असं म्हणत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांवरही टीका केली. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही आमचीही त्यांच्यापासून सुटका झाली असा टोला शरद पवार यांनी लगावला. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली, त्यावेळी कांदा निर्यातबंदीचा निर्णय सरकारने घेतला. आम्ही सत्तेत असताना आम्ही एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत होतो, पण आताच्या सरकारने अनेक विमा कंपन्या काढून सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, अशा सरकारला चांगला धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पक्षचा त्याग करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचा चांगलाच समाचार पवार यांनी यावेळी घेतला. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही, आमचीही त्यांच्यापासून सुटका झाली, असे ते म्हणालेत.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x