राजकोट : राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात पदार्पणातच पृथ्वी शॉने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. कारकिर्दीत स्थानिक क्रिकेटमध्येच तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी करत भारताला सुस्थितीत उभं केलं आहे. पृथ्वीने ९९ चेंडूत १०१ धावा पूर्ण केल्या आहेत.
उपाहारानंतर सुद्धा पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांनी धावांची गती चांगली ठेवली होती. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी एकूण १५० धावांची भागीदारी केली. अनुभवी खेळाडू लोकेश राहुल याच्यासह सलामीला आला. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल पायचीत झाला आणि तंबूत परतल्यानंतर पृथ्वी शॉने सामन्याची सुत्र हाती घेतली. त्यानंतर चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्याने भारतीय संघाला २३ षटकांत १ बाद १२१ धावांचा पल्ला पूर्ण करून दिला. उपहाराअखेर या दोघांनी भारताला एक बाद १३३ धावांचा पल्ला पूर्ण करून दिला.
इंग्लंडमधील झालेल्या महानिकारक पराभवानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध संपूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार यात काहीच शंका नव्हती. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामना सुरु होताच पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला.
What a moment this is for young @PrithviShaw ????????
Brings up his FIRST Test ???? off 99 deliveries. pic.twitter.com/fBN4VQP2fD
— BCCI (@BCCI) October 4, 2018
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		