12 May 2024 7:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

'५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’, मोदींना राष्ट्रवादीचे खोचक प्रश्न

मुंबई : एनसीपीने आपल्या ‘जवाब दो’ मोहिमेअंतर्गत आता थेट पंतप्रधानांना लक्ष्य करत त्यांच्या परदेश वारी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. लवकरच पंतप्रधानांच्या परदेश वारीचे शतक पूर्ण होत असले तरी देशाने त्यातून काय साधले असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना विचारला आहे. युपीएच्या काळात ९ वर्षात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटी रुपये खर्च झाले होते. तर दुसरीकडे मोदींच्या परदेश दौऱ्यांवर आज पर्यंत तब्बल १४७४ कोटी रुपये खर्च झाले तरी त्यातून देशाला काय सध्या झालं असा सवाल केलं आहे.

#जवाबदो हॅशटॅग वापरून मोदींना रोज एक प्रश्न विचारला जात आहे. तसेच ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ म्हणत मागील दीड महिन्यापासून एनसीपीकडून राज्य तसेच केंद्र सरकारला लक्ष करण्यात येत आहे. त्यातील आज ४२वा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राष्ट्रवादीने ट्विट करत म्हटलं आहे की, मोदींच्या विदेश दौऱ्यांवर जवळपास १,४७४ कोटी इतका प्रचंड पैसा खर्च झाला आहे. आता लवकरच त्यांच्या विदेश दौऱ्यांचे शतक सुद्धा पूर्ण हीनार आहे. त्याला अनुसरून एनसीपीने पंतप्रधानांना लक्ष केलं आहे.

दरम्यान, मोदींच्या या विदेश दौऱ्यांमुळे भारताला नक्की कोणता फायदा झाला आहे?” असा प्रश्न ट्विट मध्ये विचारण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलला टॅग सुद्धा करण्यात आले आहे. दरम्यान त्यासाठी राष्ट्रवादीने व्यंगचित्राचा सुद्धा आसरा घेतला आहे.

काय आहे ते नेमकं ट्विट?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x