2 May 2024 5:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

सत्तेतून कधी बाहेर पडणार? मला राजकारण शिकवायची गरज नाही: उद्धव ठाकरे

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आक्रमक झाली असून विकासापासून लोकांचं लक्ष हटविण्यासाठी सत्तेत राहून केंद्र आणि राज्यातल्या सरकारला टीका करत असून आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राम मंदिराच्या भावनिक विषयाला हात घातला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील लोकांना शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशात म्हणजे अयोध्येला जाणार आहेत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.

शिवसेनेच्या ५२व्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात संयत स्पष्ट दिसत होता. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत युती तोडण्याबाबत त्यांनी कोणताही उल्लेख केला नसला, केवळ भाषणात बोलताना ‘काय ते परत परत बोलायचं’ असं म्हणत वेळ मारून घेतली. तरी आम्ही सत्तेत हिंदुत्वासाठीच आहोत, असे सांगत सामान्यांच्या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष सुद्धा कायम राहील, असे सुद्धा भाषणात म्हटलं.

पुढे सत्ता सोडण्याच्या विषयाला अनुसरून म्हणाले की, मला राजकारण शिकविण्याच्या फंदात कोणी पडू नये, असे थेट उत्तर दिले. तसेच शिवसेनेला कान टोचणे वगरे जमत नाही. कारण शिवसेना थेट कानाखाली आवाज काढते. तसाच आवाज या केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना काढते आहे. दरम्यान संघाचा उल्लेख करत ते म्हणाले की, आरएसएसचे पदाधिकारी देखील मोदी सरकारवर नाराज आहेत. मग असं असताना त्यांना तुम्ही विचारता का की सरकारच्या विरोधात आंदोलन करणार म्हणून, असा प्रतिप्रश्न त्यांनी विरोधकांच्या सत्ता सोडण्याच्या प्रश्नावर केला

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x