3 August 2020 2:18 PM
अँप डाउनलोड

राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन

IPS Arvind Inamdar, DGP Arvind Inamdar, Mumbai Police, Maharashtra Police

मुंबई: राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

अरविंद इनामदार यांनी नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केलं. त्यांच्या नेतृत्त्वात पोलिस दलात अनेक विद्यार्थी घडले. अरविंद इनामदार यांनी गाजलेलं जळगाव सेक्स स्कॅण्डलचं प्रकरण यशस्वीपणे हाताळलं होतं. त्यांनी नेहमीच पोलिस खात्यातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत.

इनामदार हे पोलीस दलात कार्यरत असले तरी ते मनाने अतिशय संवेदनशील होते. त्यांच्यातील माणूस कायम जागा होता. म्हणून त्यांनी जपलेली मूल्ये आणि माणुसकीशी कधीही तडजोड केली नाही. आपल्या भगवद्गीतेचा मोठा प्रभाव असल्याचे ते नेहमी सांगत. इनामदार साहित्य वर्तुळातही तितकेच लोकप्रिय होते. लेखक म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. खुसखुशीत भाषा शैली, आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत.

अरविंद इनामदार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर गावात झाला होता. अरविंद इनामदार १ ऑक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x