11 May 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे ८२व्या वर्षी निधन

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदन लाल खुराना हे मागील काही वर्ष मेंदूज्वरामुळे कोमामध्ये गेले होते. काल रात्री उशिरा राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांचे पुत्र हरिश खुराना यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

दुर्दैवाने, काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका मुलाचे सुद्धा हृदयविकाराने निधन झाले होते. दिल्लीच मुख्यमंत्रीपद भूषविलेले मदनलाल खुराना हे भाजपमधील मोठे नेते होते म्हणून सर्वश्रुत होते. दिल्लीच्या राजकारणात ते अनेक वर्ष सक्रीय होते. १९९३ ते १९९६ या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्री सुद्धा राहिले होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबरला पाकिस्तानच्या फैलसाबादमध्ये झाला होता.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मदनलाल खुराना हे संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्री सुद्धा राहिले होते. दिल्लीमधून ते ४ वेळा संसदेवर निवडून गेले होते. तसेच २००१ मध्ये त्यांची नियुक्ती राजस्थानच्या राज्यपालपदी झाली होती.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x