2 May 2025 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
x

ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई : मराठी संगीत जगतावर अनेक वर्ष आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज इस्पितळात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज सायंकाळीच ४ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपासून त्यांच्यावर दादर येथील शुश्रूषा या खासगी इस्पितळात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, तपासणीनंतर त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे समोर आले. त्याचबरोबर त्यांना न्यूमोनिया सुद्धा जडल्याचे निदान झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते.

त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ साली झाला होता. दरम्यान, वडिलांकडूनच त्यांना संगीताचे सुरुवातीचे धडे गिरवले होते. वडिलांकडूनच त्यांना तालाचे बाळकडू सुद्धा मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले होते. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’ अशा एक ना अनेक बहारदार गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देव यांनी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले होते. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकांसाठीही त्यांनी महत्वाचं योगदान दिले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या