17 May 2024 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

'मेक इन इंडिया - स्किल इंडिया' नारा देत चिनी कामगारांकडून बनवून घेतला 'स्टॅचू ऑफ युनिटी'

अहमदाबाद : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील नर्मदा नदीच्या क्षेत्रात तब्बल २,९८९ कोटी खर्च करून उभारलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण केले. वास्तविक या पुतळ्याची उभारणी करताना त्याची सर्वाधिक झळ ही स्थानिक २२ गावातील गावकऱ्यांना बसली आहे. हा पुतळा उभारताना आजूबाजूच्या धरणक्षेत्राची सुद्धा मोडतोड झाल्याचे स्थानिक लोकं सांगतात. दरम्यान, इथल्या आजूबाजूच्या अनेक भागाचं नुकसान झाल्याने गावातील लोकांच्या उपजीविकेचा मार्ग सुद्धा बंद झाला आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनविण्यासाठी सरदार सरोवर येथील धरणाची खूप मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक २२ गावांचे ग्रामस्थ मोदींच्या हट्टीपणावर प्रचंड नाराज झाले आहेत. त्यामुळे खुल्या पत्रात या गावकऱ्यांनी म्हटले आहे की ‘आज जर सरदार पटेल जिवंत असते तर मुर्तीसाठी करण्यात आलेली धरण परिसरातील तोडफोड पाहून त्यांना सुद्धा रडू कोसळले असते. इतकंच नाही तर तुम्ही मोठा गाजावाजा करत उदघाटनाला या परंतु आम्ही गावकरी तुमचे स्वागत करणार नाही, असं खणखणीत उत्तर त्या गावकऱ्यांनी खुल्या पत्रात मोदींना दिल आहे.

तसेच तुम्ही सरदार पटेलांच्या मुर्तीच्या उद्घाटनासाठी ३१ तारखेला अहमदाबादमध्ये याल तेव्हा आम्ही गावकरी तुमचे अजिबात स्वागत करणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे नको असलेल्या पाहुण्यासारखे बिनधास्त या पण आम्ही गावकरी तुमचे अजिबात स्वागत करणार नाही.’, असं गावकऱ्यांनी पत्रात ठणकावलं आहे.

दरम्यान, जगभर दौरे करणाऱ्या मोदींनी भाषणादरम्यान “मेक इन इंडिया” आणि “स्किल इंडिया” अर्थात कुशल कामगार असे नारे दिले खरे, पण स्किल इंडिया बनविण्यासाठी मागील ४ वर्षात घोषणा देण्याव्यतिरिक्त काय केलं ते सर्वश्रुत आहे. त्यामुळेच “स्किल” असलेले कामगार मागील ४ वर्षात मोदी सरकारला “स्किल इंडिया” मोहिमेअंतर्गत निर्माण करताच आले नाहीत. परिमाणी “मेक इन इंडिया” साठी गरजेचे “स्किल कामगार” उपलब्ध होऊ न शकल्याने अखेर सर्व गोष्टी आजही शत्रूराष्ट्र चायना’वर विसंबून आहेत. अगदी तंत्रज्ञान नव्हे तर कामगार सुद्धा चायना मधून आयात करण्याची वेळ चक्क गुजरात सरकारवर आली.

सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी तब्बल २,९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दरम्यान, २७ ऑक्टोबर २०१४ रोजी लार्सन अॅण्ड टुब्रोने या मुर्ती बांधणीचे कंत्राट मिळवले होते. त्या भव्य पुतळ्याच्या उभारणीसाठी २,५०० कामगार आणि तब्बल २०० इंजिनिअर्सने आपले कौशल्य पणाला लावून ही मुर्ती साकारणार होते. परंतु केवळ घोषणेत “स्किल इंडिया” म्हणजे “कुशल कामगार” अशी २०१४ पासून भाषणबाजी करणाऱ्या पंतप्रधांना “मेक इन इंडिया”च्या अंतर्गत कंत्राटदार कंपनीमार्फत मोठ्याप्रमाणावर चिनी कामगार आणि इंजिनिअर्सचाच अधिक भरणा या पुतळा उभारणीसाठी करावा लागला. प्रसार माध्यमांनी जेव्हा या चिनी कामगारांबाबत गुजरात सरकारकडे विचारणा करत “स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया”च्या घोषणाबाजीला अर्थ तरी काय असा प्रश्न विचारला असता, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी थेट कंत्राटदार कंपनीवर जवाबदारी झटकून हात वर केले. त्यामुळे भाजप सरकारच्या घोषणा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात काय वास्तव आहे ते सिद्ध होतं.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x