4 May 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

सिंगापूर: गुंतवणुकीसाठी भारत उत्तम ठिकाण : पंतप्रधान

सिंगापुर : सिंगापूर सध्या फिनटेक फेस्ट सुरु असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. दरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की,”आज तंत्रज्ञानाच्या ताकदीची व्याख्या बदलत असून यात तरुणांचं मोलाचं योगदान आहे. तरुणांची एकूण क्षमता आणि त्यांच्या ऊर्जेवर विश्वास दाखवला पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधानांनी भाषणादरम्यान केले. तसेच उपस्थित फिनटेक कंपन्यांच्या प्रतिनिधींना भारतात गुंतवणुक करण्याचे जाहीर निमंत्रण सुद्धा दिले.

दरम्यान, यावेळी त्यांनी जनधन योजनेचा आवर्जून उल्लेख करत भारत सरकारने आर्थिक समावेशनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती सुद्धा उपस्थितांना करून दिली. ते म्हणाले, आमचे सरकार २०१४ मध्ये सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवतच सत्तेवर आले. आमच्या सरकारने दुर्गम भागातील सर्व सामान्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक बदल घडवले आहेत. भारतासारख्या देशात हे सोपे नव्हते. त्यासाठी आर्थिक समावेशनाच्या ठोस आधाराची सुद्धा आम्हाला प्रचंड गरज होती. आज सुमारे १.३ अब्ज भारतीयांसाठी आर्थिक समावेशनाचे हे एक सत्य आहे. आम्ही खूप कमी वेळात १.२ अब्जाहून अधिक बायोमॅट्रिक ओळख असणारे आधार सुद्धा बनवले आहेत असं मोदी म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x