श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने आज आणखी एक विक्रम केला आहे. ISRO ने PSLV-C43 अर्थात पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकल या रॉकेट लाँचरच्या सहाय्याने भारताच्या हाइपरस्‍पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाईटसहित इतर आठ देशांचे तब्बल ३० उपग्रह एकाचवेळी अवकाशात प्रक्षेपीत करणार आहे.

इस्त्रोने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५:५८ वाजताच श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात या प्रक्षेपणाचे काऊनडाऊन सुरु होणार आहे. त्यांच्यासार आज सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी पीएसएलवी-सी४३ अंतराळात यशस्वीरीत्या झेपावेल. प्रक्षेपीत करण्यात येणाऱ्या तीस उपग्रहांपैकी तब्बल २३ उपग्रह एकट्या अमेरिकेचे आहेत, तर पीएसएलवी-सी४३चे हे ४५ वे प्रक्षेपण आहे.

PSLVC 43 successfully injects Indian satellite HysIS into sun synchronous polar orbit