15 December 2024 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

PM Modi On Kala Jadu | मोदींनी देशावरील 'काली जादू' म्हणत काँग्रेसवर केलेल्या टीकेला नेटिझन्सकडून जोरदार प्रतिउत्तर

PM Modi On Kala Jadu

PM Modi On Kala Jadu | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हरियाणातील कार्क्रमादरम्यान काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. आज देश तिरंग्याच्या रंगात रंगला असताना निराशा आणि नकारात्मकतेत बुडालेले काही लोक काळ्या जादूत अडकले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. “काही लोक आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत. काळ्या जादूचा प्रसार करण्याचा प्रयत्न कसा केला गेला हे आपण ५ ऑगस्ट रोजी पाहिले आहे.

या लोकांना असं वाटतं की, काळे कपडे घातल्याने त्यांच्या निराशेचा आणि निराशेचा काळ संपेल,” असं म्हणत त्यांनी 5 ऑगस्ट रोजी काळ्या कपड्यांमध्ये काँग्रेसच्या निषेधाचा उल्लेख केला. लोकांनी कितीही भूतदया, काळी जादू केली, तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा कधीही निर्माण होणार नाही. या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे आणि देशभरातील नेटिझन्सनी भाजपच्या नेत्यांना उघडं पडण्यास सुरुवात केली आहे.

काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यानंतर पंतप्रधान आता काळ्या कपड्यांना अर्थहीन मुद्दा बनवत आहेत, असा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर पलटवार केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “काळा पैसा आणण्यासाठी ते काहीही करू शकले नाहीत, आता ते काळ्या कपड्यांबद्दल निरर्थक मुद्दा बनवत आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या समस्यांवर बोलावे अशी देशाची इच्छा आहे, पण जुमला जीवी काहीही बोलत राहतात. काळ्या रंगाचे कपडे घालून गंगेत डुबकी मारतानाचा पंतप्रधानांचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

त्यानंतर नेटिझन्स सुद्धा भाजपच्या देशभरातील नेत्यांची #KalaJadu फिरकी घेऊ लागले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Modi On Kala Jadu statement boomerang on BJP leadrs on social media 11 August 2022.

हॅशटॅग्स

#PM Modi On Kala Jadu(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x