28 April 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा
x

विरोधकांकडून करप्टमोदी.कॉम वेबसाइट लाँच, सर्व भ्रष्टाचारांची माहिती

नवी दिल्ली : सध्या विरोधकांनी सुद्धा भाजपाला डिजिटल जगाचा चांगलाच इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत आणि भाजप प्रणित विविध राज्यांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने केलेले घोटाळे लोकांसमोर पोहोचविण्यासाठी विरोधकांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी थेट करप्टमोदी.कॉम म्हणजे CorruptModi.com नावाने वेबसाइट लाँच करून भाजपचे सर्व घोटाळे सार्वजनिक केले आहेत.

‘ना खाऊंगा ना खाणे दूंगा’ असा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व घोटाळे या वेबसाईटच्या माध्यमातून उघड करण्यात आले आहेत. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी व त्यांच्या मीडिया मॅनेजर्सनी बदलता काळ ओळखत समाज माध्यम आणि डिजिटल माध्यमांचा लोकसभा निवडणुकांमध्ये अत्यंत प्रभावी वापर केला होता. आता भाजपाचे तेच तंत्र त्यांच्यावर उलटविण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. त्यासाठीच भाजपच्या सर्व घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी www.corruptmodi.com अशी एक वेबसाईटच सुरू करण्यात आली आहे.

या वेबसाईटमध्ये A टू Z अशा पर्यायांवर तुम्ही क्लिक करून निरनिराळे घोटाळे पाहू शकता. तर दुसरीकडे होमपेजवर घोटाळ्यांसंबंधित सध्याच्या ताज्या बातम्या आहेत आणि व्हिडीयो सेक्शन सुद्धा देण्यात आला आहे. या साईटवर केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या फक्त लिंक देण्यात आल्या आहेत, पण वेगळे लेख, आरोप अथवा विरोधी नेत्यांची भाषणं वगैरे असे काही सुद्धा दिलेले नाही. केवळ मोदी सरकारच्या आणि भाजप प्रणित राज्यांमधील माहिती येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सदर साईटवर दिलेल्या घोटाळ्यांच्या काही बातम्या पुढीलप्रमाणे: त्यात निरव मोदी घोटाळा, राफेल घोटाळा, पीडीएस घोटाळा, व्यापम घोटाळा, खाण घोटाळा, जय शाह घोटाळा, पियुष गोयल घोटाळा, मनरेगा घोटाळा, महाकुंभमेळा घोटाळा आणि बिटकॉइन घोटाळा असे एक ना अनेक घोटाळ्यांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x