भोपाळ : आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही असे उमा भारती यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. तसेच यापुढे मी संपूर्ण लक्ष अयोध्येतील राम मंदिर आणि गंगा नदीवर केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केले आहे. उमा भारतींनी हा मोठा निर्णय घेतला असला तरी मूळ कारण वेगळंच असल्याचं वृत्त आहे.

वास्तविक काही महिन्यांपूर्वी त्यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका होती. त्यात त्यांनी नरेंद्र मोदी हे विकासपुरुष नाही तर ‘भकास पुरुष’ आहेत असं म्हटलं होतं. तसेच मोदी नावाच्या फुग्यात प्रसार माध्यमांनीच हवा भरली होती आणि ती प्रसार माध्यमांनाच काढावी लागेल असं म्हटलं होतं. त्यावेळीच त्यांचा अमित शहा आणि मोदींनी पत्ता कट केल्याचे समजते.

काय म्हणाल्या होत्या उमा भरती मोदींबद्दल त्यावेळी?

bjp leader will not contest lok sabha election in 2019