18 May 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
x

आरबीआय गव्हर्नरपदी दास यांची नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात : उद्धव ठाकरे

मुंबई : आरबीआय’च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. मोदी सरकारला कोणत्याही विषयात सत्य समोर ठेवणारे लोक नको असून केवळ हो ला हो बोलणारे होयबा हवेत अशी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नेमणूक त्याच उद्देशाने झाली असेल तर ही येऊ घातलेल्या आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून आज व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याचे सामनातून म्हटलं आहे.

याआधी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी सुद्धा याच विषयाला अनुसरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते आणि त्यात आता शिवसेनेने भर टाकली आहे. विशेष म्हणजे खासदार व डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आणि हे सर्व आरोप कागदावरील आहेत. परंतु, असं सर्व असताना सुद्धा दास यांना देशाच्या सर्वोच्च आर्थिक संस्थेच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले आहे आणि हे भविष्यासाठी धक्कादायक आहे असं म्हटलं आहे.

शक्तिकांत दास यांची अतिमहत्वाच्या पदी नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’ आणि थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको, दास देशभरातील राजकारण्यांशी चांगले हित संबंध ठेवून आहेत. परंतु इथे विषय महागाई आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे. सत्ताधाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी निर्माण केलेली ही भुताटकी आरबीआयचे गव्हर्नर कशी आटोक्यात आणणार ?, असा थेट प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या नियुक्तीवरून भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर चोहो बाजूने टीका होताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x