3 May 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Mutual Fund SIP | 5000 रुपयांच्या SIP वर फक्त 10% टॉप-अप करा, मिळेल दुप्पट परतावा, असा होईल फायदा My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
x

मोदी सरकारकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची आकडेवारीच नाही: केंद्रीय कृषीमंत्र्यांची कबुली

नवी दिल्ली : सरकार बदललं तरी देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सजून तशाच कायम आहेत. काही दिवसांपासून देशभर विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनं पुकारली आणि थेट दिल्लीवर मोर्चे निघाले होते. देशभर शेतकऱ्यांची समस्या अतिशय गंभीर असताना मोदी सरकारमधील कृषिमंत्र्यांनी एक धक्कादायक कबुली दिली आहे.

मोदी नेहमीच भाषणात शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याची घोषणा करत असतात. मात्र केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात लोकसभेत दिलेल्या माहितीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आहे. कारण, मागील ३ वर्षात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची कोणतीही माहिती मोदी सरकारकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी थेट लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात काबुल केलं आहे. २०१६ नंतर म्हणजे मागील ३ वर्ष ही आकडेवारी उपलब्ध नाही. तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना कृषिमंत्र्यांनी ही माहिती सभागृहाला दिली.

लोकसभेत उत्तर देताना सिंह म्हणाले, National Crime Records Bureau अर्थात ‘NCRB’ ही संस्था शेतकरी आत्महत्येसंदर्भात देशभरातून माहिती गोळा करत असते. परंतु, या संस्थेने २०१५ नंतर आत्महत्येची कोणतीही आकडेवारीच जाहीर केलेली नाही. NCRB ही संस्था राजनाथ सिंग यांच्याकडे असलेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येते. सरकारकडे मागील ३ वर्षातली आकडेवारीच नसेल तर पीडितांच पुनर्वसन कसं करणार असा सवाल त्रिवेदी यावेळी उपस्थित केला आहे.

२०१५ मधील आकडेवाडीनुसार NCRB च्या वर्षभरात ८,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती. यात सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. २०१५ मध्ये महाराष्ट्र ३०३०, तेलंगणा १३५८, कर्नाटक ११९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या असा तो अहवाल होता. तर ४,५०० शेतमजुरांनी आत्महत्या केल्याची माहिती सुद्धा त्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली होती. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची इतकी भयानक स्थिती असताना दरवर्षी ही आकडेवारी प्रसिद्ध व्हायला पाहिजे, अशी थेट मागणी विरोधकांनी लोकसभेत उचलून धरली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x