भोपाळ : मध्यप्रदेशातील कालमनाथ सरकारने शेतकऱ्यांवर सवलतींचा सपाट सुरु केला आहे. मुख्यमंत्री कमलानाथ यांनी केवळ आठवड्याभराच्या आत दुसरा मोठा निर्णय घेतल्याचे समजते. लवकरच राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याचे वृत्त आहे.

राज्यातील तब्बल ४० लाख ज्येष्ठ शेतकऱ्यांना महिन्याला १,००० रुपये पेन्शन मिळणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीनंतर आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर केवळ २ तासांत कमलनाथ यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर आता कमलनाथ सरकारने शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय मोठा निर्णय घेतला आहे.

कमलनाथ सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास ४० लाख वृद्ध पेंशनधारकांना प्रति महिना १,००० रुपये पेन्शन देण्यासाठी कॉंग्रेसचे वचनपत्र राज्याच्या मुख्य सचिवांना धाडले आहे. त्यानुसार मध्यप्रदेशच्या मुख्य सचिवांनी कॉंग्रेसचे हे वचनपत्र राज्यातील विविध विभागांना पाठविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केली आहेत, अशा १० लाख शेतकऱ्यांना प्रति महिना १,००० रुपये पेन्शन मिळणार असल्याचे समजते. त्यानुसार लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

kamalnath government to start pension for senior farmers in the madhya pradesh