28 June 2022 6:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Investment | व्हिस्की मेकर कंपनी ऑफिसर्स चॉइस IPO लाँच करणार | गुंतवणुकीची संधी Mutual Fund Investment | या आहेत पैसे दुप्पट-तिप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना | फंडस् लक्षात ठेवा Home Loan Top-Up | कर्जाच्या ईएमआयने घराशी संबंधित खर्च भागत नाही? | टॉप-अपचा पर्याय निवडा RD Vs SIP | या 2 पर्यायांपैकी कशामध्ये दर महिन्याला रु. 2000 गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे | फायद्याचं गणित जाणून घ्या Maharashtra Govt Recruitment | महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित नवीन जीआर प्रसिद्ध | संपूर्ण GR वाचा शिवसेना पूर्णपणे संपविण्यासाठी दिल्लीत जोरदार बैठका | आता शिंदेंवर सेनेचे खासदार फोडण्यासाठी दबाव वाढवला? शिंदेसोबत बैठकीसाठी फडणवीस दिल्लीला | सोबत वकिल महेश जेठमलानी सुद्धा | शिंदे गट कायद्याच्या कचाट्यात
x

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी निरव मोदी सुद्धा इंग्लंडमध्येच: सरकारची कबुली

नवी दिल्ली : हजारो कोटींच्या पीएनबी बँक घोट्यातील प्रमुख फरार आरोपी निरव मोदी सुद्धा इंग्लंडमध्ये वास्तव्याला असल्याचे उघड झाले आहे. ब्रिटीश यंत्रणांनी भारत सरकारला त्यासंदर्भात अधिकृत माहिती पुरवली आहे. स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. मँचेस्टरच्या नॅशनल सेंट्रल ब्युरोने घोटाळेबाज फरार आरोपी नीरव मोदी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याचे भारत सरकारला कळवले आहे.

दरम्यान, हिरेव्यापारी नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात भारत सरकारने ऑगस्ट २०१८ मध्ये ब्रिटिश सरकारला विनंतीचे २ अर्ज पाठवले होते. त्यातील एक अर्ज सीबीआय़च्या तर दुसरा अर्ज अंमलबजावणी संचलानलयाकडून अर्थात ईडी’कडून करण्यात आला होता. त्यामुळे सध्या हे दोन्ही अर्ज ब्रिटन सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सिंह यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तरांच्या तासात दिली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जून महिन्यात अनेक युरोपियन देशांना पत्र लिहून नीरव मोदीचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी मदत मागितली होती. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेतील ११,३०० कोटीपेक्षा जास्त रक्कमेच्या घोटाळयातील प्रमुख आरोपी आहे.

दरम्यान याच घोटाळयातील दुसरा आरोपी मेहुल चोक्सीने ४१ तासांचा विमान प्रवास करुन भारतात पोहोचणे अशक्य असल्याचे कोर्टात सांगितले आहे. ईडीने ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांविरुद्ध २ स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावरील सुनावणीत दरम्यान मेहुल चोक्सीने त्यांच्या वकिलांमार्फत ३४ पानी उत्तर कळवले आहे. त्यात मेहुल चोक्सीने म्हटले आहे की, मी पीएनबी’ला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव याआधी दिला होता. दरम्यान, सदर विषयात अजून सुद्धा पत्रव्यवहार सुरुच आहे. मात्र, ईडीने ही बाब कोर्टापासून हेतु पुरस्कर दडवून ठेवली, असा दावा केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x