14 December 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा

Sula Vineyards Share Price

Sula Vineyards Share Price | ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत व्यवहार करत होते. आज मात्र शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 351.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअर 371.20 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 12 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. (Sula Vineyards Limited)

ब्रोकरेज फर्म CLSA ने ”सुला विनयार्ड्स’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 475 रुपये प्रति शेअर लक्ष किंमत जाहीर केली आहे. CLSA फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, मजबूत बँकएंड क्षमता आणि वितरण नेटवर्कसह ‘सुला विनयार्ड्स’ कंपनी भारतातील मोठी वाईन कंपनी आहे. मजबूत EBITDA मार्जिन कंपनीला दीर्घ मुदतीसाठी मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता देते. ब्रोकरेज फर्मच्या मते, कंपनीसाठी मद्य जाहिरातमधील बदल हा एक प्रमुख नियामक धोका ठरू शकतो.

‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचा आयपीओ मागील वर्षी लाँच करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स डिस्काउंट किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीच्या IPO शेअरची इश्यू किंमत 357 रुपये होती. तर कंपनीने आपल्या IPO मधून 960 कोटी रुपये भांडवल जमा केले होते. ‘सुला विनयार्ड्स’ ही भारतातील सर्वात मोठी वाइन उत्पादक आणि विक्रेता कंपनी असून कंपनीने 52 टक्के मार्केट काबीज केला आहे. ही कंपनी मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 56 वेगवेगळ्या ब्रँडची वाईन बनवते. भारतातील दारू कंपन्यांमध्ये सर्वात मोठे वितरण नेटवर्क असणाऱ्या ‘सुला विनयार्ड्स’ कंपनीचे 13,000 रिटेल टचपॉइंट्स आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sula Vineyards Share Price BSE 543711 on 23 March 2023.

हॅशटॅग्स

Sula Vineyards Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x