27 July 2024 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या

SBI Share Price

SBI Share Price | ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चे शेअर्स डिसेंबर 2022 मध्ये 629.55 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 518.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, भारतातील सर्वात मोठ्या बँकेचे मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते एसबीआय बँकेचे शेअर्स पुढील काळात बेस बिल्डिंग मोडमधून बाहेर पडून नवीन उच्चांक स्पर्श करतील. (State Bank of India Limited)

शेअरची टार्गेट प्राईस:
डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ चे शेअर्स पुढील काळात 725 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. सध्या जर तुम्ही SBI चे शेअर्स 525 रुपयांच्या पातळीवर खरेदी केले तर, तुम्हाला 40 टक्के नफा मिळू शकतो. ब्रोकरेज फर्मने घसरणीवर शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

2023 या वर्षात SBI बँकेचे शेअर्स 15 टक्के कमजोर झाले आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ च्या शेअर्सवर सकारात्मक मत व्यक्त केले आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, मजबूत कर्ज वाढ, मार्जिन विस्तार, कमी तरतुदींमुळे एसबीआय बँकेची कामगिरी सकारात्मक राहू शकते. मोतीलाल ओसवाल फर्मच्या मते, सुधारित ट्रेझरी कामगिरी आणि नियंत्रित ओपेक्स यामुळे SBI बँकेने कोर PPOP मध्ये मजबूत वाढ नोंदवली आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ च्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 430.80 रुपये होती. स्टेट बँक ऑफ इंडियामधील ग्राहक वर्ग 45 कोटींहून मोठा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Share Price BSE 500112 NSE SBIN on 23 March 2023.

हॅशटॅग्स

#SBI Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x