मुंबई : शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा म्हणजे विधानपरिषद आमदारकीचा कालावधी आज संपणार आहे. दरम्यान, मी पक्षावर नाराज नाही, परंतु शिवसेनेत मला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल अशी आशा आहे, असं त्यांनी प्रसार माध्यमांकडे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, दीपक सावंत यांची जागा खाली झाल्याने आणि ही जागा शिवसेनेच्या कोट्यात असल्याने त्याजागी कोणाची वर्णी लागणार ते पाहावं लागणार आहे. या पदासाठी सध्या शिवसेनेत जोरदार फिल्डिंग लागल्याचे वृत्त आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून आदित्य ठाकरेंच्या समर्थकांची वर्णी लागल्याने आणि त्यांनी दीपक सावंत यांना कडाडून विरोध केल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात होते. तेव्हापासूनच सावंत पक्षावर नाराज असल्याचे वृत्त पसरले होते. समजले होते. जाणीवपूर्वक पत्ता कापण्यात आल्यामुळे डॉ. दीपक सावंत यांनी गेल्या वर्षी ४ जुनला आमदारकीचा राजीनामा दिला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजीनामा थांबवण्याचा सल्ला दिला.
